मुंबई, 21 जून: मुंबई कोरोनाच्या नियमांचं उल्लंघन (Flouting Covid Norms)झाल्याची घटना समोर आली आहे. कोविडचे सर्व नियम धाब्यावर बसवून बर्थडे पार्टी केल्याचं उघड झालं आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी 60 ते 70 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. (Covid 19 lockdown rules) शुक्रवारी रात्री अंधेरी पूर्व येथे बर्थडे पार्टीला हजेरी लावणाऱ्या 60 ते 70 जणांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. (MIDC police Sunday booked 60 to 70 people) कोरोना नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यात इव्हेंट मॅनेजर आणि हॉल मालकाविरूद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. MIDC पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावर एक व्हिडिओविषयी आम्हाला माहिती मिळाली. या व्हिडिओत एका पार्टीत 60 ते 70 जण विनामास्क होते. तसंच त्यांनी कोणत्याही प्रकारचं सोशल डिस्टन्सिंग पालन केलेलं नव्हतं. हेही वाचा- राज्य सरकार 5 वर्ष चालणार?, संजय राऊत यांची मोठी प्रतिक्रिया त्या व्हिडिओची चौकशी केली असता अंधेरी (पूर्वेकडील) येथील चकला येथे एका हॉलमध्ये 19 जून रोजी रात्री 8 ते 11 या दरम्यान एक बर्थडे पार्टी आयोजित केली होती. पार्टीचा आयोजक अर्जुन यादव उर्फ पॉवर, हॉलचा मालक अरुण सिंह यांच्यासह सर्व उपस्थितांवर आयपीसी आणि साथीचे रोग कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंढरपुरातही घडली अशीच घटना संत ज्ञानेश्वर महाराज पालखी तळावर वाढदिवसाची पार्टी करण्यात आली. वाखरी येथील विसावा स्थळावर चौथऱ्यावर चढवून समाजकंटकांनी केक कापून बर्थडे साजरा केला. सरकारी कर्मचाऱ्याचा वाढदिवस विसावा येथे साजरा केल्याने वारकरी आणि भाविकांनी संताप व्यक्त केला आहे. ग्रामसेवकच्या वाढदिवसाला उपसरपंच यांनी हजेरी लावली होती. वाखरी ग्रामस्थांनी पायी वारीला विरोध केला असताना विसावा येथे वाढदिवस साजरा केल्याने वारकरी आणि भाविक चांगलेच संतापले.