JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / मुंबईत ‘हा’ भाग बनला सर्वात मोठा कोरोना HOT SPOT, रुग्णसंख्या वाचून बसेल धक्का

मुंबईत ‘हा’ भाग बनला सर्वात मोठा कोरोना HOT SPOT, रुग्णसंख्या वाचून बसेल धक्का

मुंबईत 5 वॉर्डात तब्बल 4 हजारांपेक्षा अधिक रुग्ण आहेत. त्यामुळे सरकारची चिंता वाढली आहे. आता पावसाळा लागल्याने रुग्णसंख्या वाढण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 27 जून: कोरोना रुग्णाच्या (Corona Patient) संख्येने मुंबईत (Mumbai) कहर केला आहे. राज्यात सर्वात जास्त बाधितांची संख्या ही मुंबईतच आहे. सुरुवातीला धारावीने हादरवून सोडलं होतं. आता मात्र धारावी नाही तर अंधेरी पूर्व (Andheri east) हा भाग कोरोनाचा HOT SPOT झाला असून या भागात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येने 5000चा आकडा पार केला आहे. अंधेरी पूर्व हा मुंबईतील पहिला प्रभाग आहे ज्यात 5 हजारांपेक्षा अधिक रुग्ण सापडले आहेत. तर एस प्रभाग म्हणजेच भांडुप, विक्रोळी, कांजूरमार्ग पवई या भागात 4000पेक्षा अधिक रुग्ण सापडले आहे. मुंबईत 5 वॉर्डात तब्बल 4 हजारांपेक्षा अधिक रुग्ण आहेत. त्यामुळे सरकारची चिंता वाढली आहे. आता पावसाळा लागल्याने रुग्णसंख्या वाढण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांची बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक येथे बैठक झाली. या बैठकीला राज्याचे मुख्य सचिव आणि मुंबई मापालिकेचे आयुक्त उपस्थित होते. लव अग्रवाल यांनी आज ठाणे आणि उत्तर मुंबईतील कोरोना रुग्णांसाठी केलेल्या उपाययोजनांची पहाणी केली. Covid-19 रुग्णांवर भारतात वापरणार हे नवं औषध, केंद्र सरकारचा मोठा निर्णय देशाच्या 8 राज्यांमधील कोरोनाचे 85.5 टक्के सक्रिय प्रकरणं आणि 87 टक्के मृत्यूचे प्रकरणं आहेत. मंत्र्यांच्या गटाच्या बैठकीत ही माहिती देण्यात आलेली आहे. कोरोनाच्या मुद्यावर आज देशातल्या मंत्री गटाची 17वी बैठक झाली. देशातील 8 राज्ये कोरोनामुळे सर्वाधिक प्रभावित असल्याचे या बैठकीत सहभागी मंत्री व अधिकाऱ्यांना सांगण्यात आले.यात महाराष्ट्र, तामिळनाडू, दिल्ली, तेलंगणा, गुजरात, उत्तर प्रदेश, आंध्रप्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यांचा समावेश आहे. नवरदेवाच्या भावाचा कोरोनामुळे मृत्यू, हळदीला आलेल्या 90 पाहुण्यांची चाचणी केंद्राने 15 उच्चस्तरीय गट तयार केले आहेत. जे राज्यांना तांत्रिक सहाय्य देण्याचे काम करीत आहेत अशी माहितीही देण्यात आली आहे. संपादन - अजय कौटिकवार

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या