JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / लोकल रखडली, ट्रॅकवरून पायी जाताना हातातून 4 महिन्याचं बाळ पाण्यात पडलं, ठाकुर्ली जवळील ह्रदयद्रावक घटना

लोकल रखडली, ट्रॅकवरून पायी जाताना हातातून 4 महिन्याचं बाळ पाण्यात पडलं, ठाकुर्ली जवळील ह्रदयद्रावक घटना

अंबरनाथ लोकल वाहतूक ठप्प झाली असतानाच एक हृदय हेलावून टाकणारी घटना घडली आहे. चार महिन्यांचे बाळ हातातून निसटल्याने पाण्यात वाहून गेलं.

जाहिरात

आईच्या डोळ्यादेखत चार महिन्यांचे बाळ पाण्यात गेले वाहून

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 19 जुलै : अंबरनाथ लोकल वाहतूक ठप्प झाली असतानाच एक हृदय हेलावून टाकणारी घटना घडली आहे. अंबरनाथ लोकल उभा राहिली असताना काही प्रवाशी लोकलमधून चालत ट्रॅकच्या बाजूने जात होते. तेव्हा एका महिलेसोबत असलेल्या पुरुषाच्या हातात असलेलं चार महिन्यांचं बाळ पाण्यात पडल्यानंतर वाहून गेलं आहे. यावेळी बाळाच्या आईचा आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता. याबाबत मिळालेली माहिती अशी की, दुपारी तीनच्या सुमारास अंबरनाथ लोकल ठाकुर्ली आणि कल्याण स्थानकादरम्यान २ तास उभा होती. यावेळी काही प्रवासी उतरून कल्याणच्या दिशेने चालत होते. त्यात एका लहान बाळाला घेऊन त्या बाळाची आई आणि एक व्यक्ती निघाले होते. तेव्हा त्यांच्या हातून चार महिन्यांचे बाळ निसटून पाण्यात पडले. पाण्याच्या वाहत्या प्रवाहासोबत बाळ वाहून गेल्याची ही दुर्देवी घटना घडलीय.

संबंधित बातम्या

उल्हासनगरमध्ये तुफान पाऊस, रेल्वे ट्रॅक, पूल पाण्याखाली Photos राज्यातील अनेक भागात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. मुंबई, ठाणे आणि उपनगरांमध्येही मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुंबईची लाइफलाइन समजली जाणारी लोकलसुद्धा यामुळे ठप्प झाली. अंबरनाथ-बदलापूर रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्याने बदलापूरहून सीएसएमटीच्या दिशेने जाणारी वाहतू ठप्प झालीय.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या