JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / राज्याच्या राजकारणातली मोठी बातमी, फडणवीसांच्या गौप्यस्फोटानंतर अजितदादा शरद पवारांच्या भेटीला

राज्याच्या राजकारणातली मोठी बातमी, फडणवीसांच्या गौप्यस्फोटानंतर अजितदादा शरद पवारांच्या भेटीला

शिवसेनेचा नकार आल्यानंतर राष्ट्रवादीकडूनच सत्तेसाठी सिग्नल मिळाले होते, असा खुलासा फडणवीसांनी केला होता.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 24 जून : विधानसभा निवडणुकीनंतर सत्ता स्थापन करत असताना घडलेल्या घडामोडींवर माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीकडूनच सत्ता स्थापनेची ऑफर होती असा खुलासा केल्यामुळे खळबळ उडाली आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादीच्या गोटात हालचालींना वेग आला असून अजित पवार हे अध्यक्ष शरद पवारांच्या भेटीला पोहोचले आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे शरद पवार यांची भेट घेण्यासाठी सिल्व्हर ओक बंगल्यावर दाखल झाले आहे.  देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यानंतर या भेटीला महत्त्व प्राप्त झाले आहे. ज्येष्ठ पत्रकार राजू परूळेकर यांनी Insiderसाठी घेतलेल्या मुलाखतीत  फडणवीस यांनी अनेक स्फोटक खुलासे केले होते. शिवसेनेचा नकार आल्यानंतर राष्ट्रवादीकडूनच सत्तेसाठी सिग्नल मिळाले होते, असा खुलासा  फडणवीसांनी केला होता. फडणवीस म्हणाले, ‘2019 विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना सत्ता बनवायला तयार नसताना राष्ट्रवादी काँग्रेसकडून थेट सिग्नल होता. दोन बैठका झाल्या होत्या. त्यातील एका बैठकीला मी होतो, एकाला नाही. त्या बैठकीनंतरच दोघांनी मिळून पुढे जायचं ठरलं होतं. भाजप सोबत जायचं हा निर्णय काही एकट्या अजित पवारांनी घेतला नाही. हा निर्णय हा राष्ट्रवादीच्या नेतृत्वाचा होता’ असा खुलासाही त्यांनी केला. फडणवीसांनी नाव न घेता सरळ शरद पवारांच्या (Sharad Pawar) सांगण्यानंतरच अजित पवार भाजपला मिळाले असं थेटपणे सूचित केलं. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आमच्या बाजुने असता तर माझं आणि अजित पवारांचे सरकार 100 टक्के टिकले असते, असं मतही त्यांनी व्यक्त केलं होतं. ‘भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार दोनच वर्षांपूर्वी बनले असते. पण काही गोष्टी जुळून येऊ शकल्या नाहीत’ असंही ते म्हणाले. सत्तेत असताना उद्धव ठाकरेंची एकही गोष्ट अव्हेरली नाही. त्यामुळे त्यांच्या वागण्याचा सात्विक संताप आला, असंही त्यांनी सांगितलं. संपादन - सचिन साळवे

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या