मुंबई, 07 जून : ‘देवों के देव महादेव’ मालिकेतून प्रसिद्ध झालेला अभिनेता मोहीत रैना (Actor Mohit Raina) यानं मुंबईत गोरेगांव पोलिसांत चार जणांच्या विरोधात तक्रार (Police complaint) दाखल केली आहे. सोशल मीडियावर (Spcial Media) रोहितच्या संदर्भात काही जणांनी चुकीची आणि धक्कादायक माहिती प्रसारीत केली होती. तसंच अफवा पसरवण्यात आल्या होत्या. त्यानंतर त्यांनं पोलिसांत तक्रार दाखल करत त्यांच्या विरोधात पावलं उचलली आहेत. (वाचा- BREAKING : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार, पंतप्रधान मोदींची घेणार भेट! ) ‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक’ आणि भौकालसारख्या वेब सीरीज द्वारे प्रसिद्ध झालेला प्रसिद्ध अभिनेता मोहीत रैना याच्या बाबतीत एक आश्चर्यकारक दावा सोशल मीडियावर करण्यात आला आहे. मोहीत रैनाची शुभचिंतक असल्याचा दावा करत सारा शर्मा नावाच्या एका तरुणीनं सोशल मीडियावर मोहीत बचाओ अभियान सुरू केलं होतं. या अभियानांतर्गत असा दावा करण्यात आला होता की, सुशांत सिंह राजपूतप्रमाणेच मोहीत रैनाचादेखिल मृत्यू होऊ शकतो. (वाचा- निदान तिकडे गेल्यावर तरी खरं बोलावं, चंद्रकांत पाटलांचा खडसेंना टोला ) अशा प्रकारची माहिती सोशल मीडियावर आल्यानंतर लगेचच मोहीत आणि त्याचे कुटुंबीय समोर आले होते. मी पूर्णपणे ठिक आणि फिट असल्याचं मोहीतनं स्पष्ट केलं होतं. याप्रकारानंतर मोहीत बोरीवली कोर्टात पोहोचला होता. बोरीवली कोर्टानं पोलिसांना या प्रकरणी मोहीतचा जबाब नोंदवून चौकशी करण्याचे निर्देशही दिले होते. त्यानंतर मोहीतच्या तक्रारीवरून गोरेगाव पोलिसांनी मोहीतचा जबाब नोंदवत सारा शर्मा आणि तिचे सहकारी परवीन शर्मा, आशिव शर्मा आणि मिथिलेश तिवारी यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. मोहीतच्या तक्रारीनुसार पोलिसांनी चौघांच्या विरोधात गुन्हेगारी कट रचणे, पोलिसांना चुकीची माहिती देणं, धमकी देणं आणि खंडणी मागणं अशा कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. कलम 384 नुसार गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. या प्रकरणी पोलिस सध्या तपास करत आहेत.