JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मुंबई / कंटेनरने 4 वाहनांना दिलेल्या धडकेत 5 जण ठार, मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील भीषण अपघाताचे PHOTOS

कंटेनरने 4 वाहनांना दिलेल्या धडकेत 5 जण ठार, मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील भीषण अपघाताचे PHOTOS

हा भीषण अपघात किलोमीटर खालापूर टोल नाक्याजवळ झालेला आहे अपघातातील मृत व्यक्ती हे नवी मुंबई नेरूळ येथील झुझांरे कुटुंबातील असल्याची प्राथमिक माहिती आहे. भरधाव कंटेनरच्या चालकाचं नियंत्रण सुटल्याने पुढे जाणाऱ्या इनोवा, क्रेटा ,टेम्पो , ट्रक अशा चार वाहनांना मागून जोरदार धडक दिल्याने ही घटना घडली आहे

0106

सोमवारची रात्र मुंबईत या अपघातात सापडलेल्यांसाठी काळरात्र ठरली. हा अपघात इतका भीषण होता की यात 5 जणांचा मृत्यू तर 5 जण जंखमी आहेत. यापैकी दोघांची परिस्थिती गंभीर आहे. तर मृतांमध्ये 5 वर्षीय चिमुरडीचाही समावेश आहे

जाहिरात
0206

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर हा भीषण अपघात झाला. भरधाव कंटेनरची चार वाहनांना धडक बसल्याने हा अपघात घडला.

जाहिरात
0306

सोमवारी मध्यरात्री मध्यरात्री मुंबई लेनवर खालापूर याठिकाणी अपघात झाला, त्याठिकाणची ही भयंकर दृश्य आहेत. यामध्ये गाड्यांचा अक्षरश: चुराडा झाला आहे.

जाहिरात
0406

मुंबईच्या गोरेगावमधील मंजू प्रकाश नाहर (58), नवी मुंबईच्या नेरुळ याठिकाणचे डॉ. वैभव वसंत झुंझारे (41), उषा वसंत झुंझारे (63), वैशाली वैभव झुंझारे (38), श्रिया वैभव झुंझारे (5) अशी या अपघातात मरण पावलेल्यांची नाव आहेत.

जाहिरात
0506

गोरेगावमधीलच स्वप्नील सोनाजी कांबळे (30), प्रकाश हेमराज नाहर (65), नवी मुंबईतील अर्णव वैभव झुंझारे (11) हे लोकं या अपघातात जखमी झाले आहेत. तर किशन चौधरी आणि काळूराम जमनाजी जाट गंभीर जखमी आहेत.

जाहिरात
0606

दरम्यान या अपघातातील मृतांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले असून जखमींवर विविध तीन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर महामार्गावर मुंबईच्या दिशेन मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. परंतु आता सर्व अपघातग्रस्त वाहनं महामार्गावरून बाजूला केल्याने मुंबईकडे जाणारी वाहतूक सुरळीत झालेली आहे

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या