JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / खेळणातल्या गाडीसारखं ट्रकला जेसीबीने ओढत आणलं, वसईतला थरारक VIDEO

खेळणातल्या गाडीसारखं ट्रकला जेसीबीने ओढत आणलं, वसईतला थरारक VIDEO

वसई डम्पिंग ग्राऊंडवर कचरा टाकणाऱ्या एका ट्रकला भीषण आग लागली.

जाहिरात

वसईतला थरारक VIDEO

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

वसई, 25 एप्रिल : मोठमोठ्या शहरात कचऱ्यांचे ढिग पाहायला मिळतात. या ढिगाऱ्यांना अनेकदा आग लागण्याच्या घटना घडतात. मात्र, वसईतील डम्पिंग ग्राऊंडवर धक्कादायक घटना घडली. कचरा टाकण्यासाठी जाणाऱ्या ट्रकला भीषण आग लागून ट्रक पूर्णपणे जळून खाक झाला आहे. सुदैवाने घटनास्थळी ड्रायव्हर नसल्याने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या घटनेचा थरकार उडवणारा व्हिडीओ आता समोर आला आहे. यातून घटनेची तीव्रता समजू शकते.

संबंधित बातम्या

काय आहे घटना? वसईच्या डम्पिंग ग्राऊंडवर कचरा टाकण्यासाठी जाणाऱ्या ट्रकला भीषण आग लागून ट्रक पूर्णपणे जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. सुदैवाने घटनास्थळी ड्रायव्हर नसल्याने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या घटनेनंतर स्वच्छता विभाग आणि महापालिकेच्या ठेकेदारावर गंभीर आरोप होत आहेत. वसईत ठेकेदार जुन्या वाहनांमधून कचरा उचलतात, असा आरोप नागरिक करतात. अशी अनेक वाहने आहेत ज्यांची देखभाल करण्यात आलेली नाही. वसई पूर्व भोयडापाडा येथे महापालिकेचे एकच डम्पिंग ग्राऊंड आहे. येथील समस्या संपण्याचे नाव घेत नाही. येथील डम्पिंग ग्राऊंड बाराही महिने आगीत जळत असते. त्यामुळे आजूबाजूच्या लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या