मुंबई 12 जानेवारी : प्रसिद्धी आणि करियरसाठी कोण काय करेल याचा काही नेम नाही. बॉलिवूडचं आकर्षण प्रत्येकालाच असतं. मात्र त्यासाठी एका महिलेने त्यासाठी आपल्या मुलाला चक्क रेल्वेतच सोडून दिल्याची घटना उघडकीस आलीय. 38 वर्षांपूर्वी घडलेली ही घटना आता उघडकीस आली असून त्या आई विरूद्ध मुलाने मुंबई उच्च न्यायालयात खटला दाखल केलाय. नुकसान भरपाई म्हणून दीड कोटींची मागणी केलीय. चित्रपटात शोभावी अशी ही कहाणी आहे. या खटल्यामुळे सगळेच आश्चर्यचकीत झाले आहेत. जस्टिस अमजद सैय्यद आणि जस्टिस अनुजा प्रभूदेसाई यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणी सुनावणी सुरू असून 13 जानेवारीला त्यावर पुढची सुनावणी होणार आहे. मुंबईतल्या जोगेश्वरीत राहणारे 40 वर्षांचे श्रीकांत शर्मा हे गेली 20 वर्ष चित्रपट क्षेत्रात मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करतात. त्यांचे वडील दीपक सबनीस यांनी 1949मध्ये उषा पंडित यांच्याशी लग्न केलं होतं अशी माहिती याचिकेत देण्यात आलीय. उषा या अतिशय महत्त्वाकांक्षी होत्या. श्रीकांत हे त्यांच्या पहिल्या पतीचं अपत्य होतं. चित्रपटात काम करण्यासाठी उषा या 1981मध्ये मुंबईत आपल्या मुलाला घेऊन मुंबईत आल्या होत्या. मुंबईत आल्यानंतर त्यांनी श्रीकांतला ट्रेनमध्येच सोडून दिलं आणि त्या निघून गेल्या. आईला पाहताच तो रडू लागला, निर्भया प्रकरणातल्या आरोपींना वाटतेय मृत्यूची भीती 26 फेब्रुवारी 1979 ला आपला जन्म झाला असून अडीच वर्षांचे असताना डेक्कन एक्सप्रेसमध्ये आईने आपल्याला सोडलं असा दावा त्यांनी याचिकेत केलाय. नंतर उषा यांनी उदय म्हसकर यांच्यीशी लग्न केलं. काही वर्षानंतर श्रीकांत यांना पोलिसांनी त्यांच्या आजीकडे पोहोचवलं. नंतर त्यांची आजी वारली आणि नंतर त्यांच्या मावशीने त्यांचा सांभाळ केला. 36 वर्षानंतर त्यांनी आपल्या आईचा सोशल मीडियाच्या माध्यमातून शोध घेतला. त्या सध्या डोंबिवलीत राहतात. VIDEO : क्षणात उद्ध्वस्त झालं घराचं स्वप्न, आणखी एक गगनचुंबी इमारत जमीनदोस्त उषा यांची आपण भेट घेतली होती मात्र त्यांनी आपल्याला टाळलं अशी माहिती श्रीकांत यांनी केलीय. त्यामुळे त्यांनी थेट मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केलीय. गेल्या तीन दशकांमध्ये आपल्याला प्रचंड मानसिक आणि त्रास झाला असून नुकसान भरपाई मिळावी अशी त्यांची मागणी आहे. आपण डोंबिवलीत जाऊन आईची भेट घेतली मात्र त्यांनी स्वीकारण्याचं तर सोडाच साधी ओळखही दाखवली नाही तर टाळण्याचा प्रयत्न केला असा दावाही श्रीकांत यांनी केलाय.