JOIN US
मराठी बातम्या / मनी / Credit Card पेमेंटची डेट निघून गेली? डोन्ट वरी, आता भरावा लागणार नाही दंड

Credit Card पेमेंटची डेट निघून गेली? डोन्ट वरी, आता भरावा लागणार नाही दंड

Credit Card : क्रेडिट कार्डवरुन कोणतीही वस्तू घेतली तर त्याचं पेमेंट ठरावीक तारखेच्या आतच करावं लागतं. अन्यथा दंड भरावा लागतो. मात्र आता क्रेडिट कार्ड धारकांना दिलासा मिळणार आहे. तो कसा तेच आपण पाहूया.

जाहिरात

क्रेडिट कार्ड बिल आरबीआय रुल

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 8 मे: सध्याच्या काळात बहुतेक लोक क्रेडिट कार्डचा वापर करतात. क्रेडिट कार्डद्वारे तुम्ही बॅलेन्सची चिंता न करता पेमेंट करू शकता. क्रेडिट कार्ड वापरण्यास सोपी असतात. यासोबतच त्याचे अनेक फायदेही आहेत. क्रेडिट कार्ड बिल पेमेंट करण्याची एक ड्यू डेट असते. बिल दिल्यानंतर त्या तारखेपर्यंत तुम्हाला बिल भरावं लागतं. पण आपण असं न केल्यास, आपल्याला दंड देखील भरावा लागतो आणि यामुळे खराब क्रेडिट स्कोअरचा धोका वाढतो. पण आता सरकारने ग्राहकांना दिलासा दिला आहे.

अनेकदा लोक क्रेडिट कार्डचे बिल पेमेंट करणं विसरतात. अशा परिस्थितीत त्यांना खराब क्रेडिट स्कोर मिळण्याची भीती असते. खरंतर ड्यू डेट नंतरही, तुम्हाला दंडाशिवाय क्रेडिट कार्ड बिल भरण्याची सुविधा मिळते आणि तुमच्या क्रेडिट स्कोअरवर परिणाम होत नाही. याबाबत आरबीआयचे नियम काय म्हणतात ते जाणून घेऊया.

एवढे दिवस लागत नाही पेनल्टी

गेल्या वर्षी रिझर्व्ह बँकेने क्रेडिट कार्ड बिल भरण्याबाबत नवा नियम लागू केला होता. ज्यामध्ये बिल भरण्याच्या ड्यू डेटनंतरही दंड न भरता बिल भरण्याची तरतूद करण्यात आली आहे. या नियमानुसार, क्रेडिट कार्ड धारक देय तारखेनंतरही 3 दिवसांपर्यंत दंड न भरता क्रेडिट कार्ड बिल भरू शकतो.म्हणजे, जर तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डचे बिल ड्यू डेटला भरण्यास विसरलात तर पुढील 3 दिवसांत दंड न भरता तुमचं बिल भरु शकता.

RuPay क्रेडिट कार्ड होल्डर्ससाठी धमाकेदार ऑफर, मिळतंय 100% कॅशबॅक आणि बरंच काही

क्रेडिट स्कोअर 3 दिवस प्रभावित होणार नाही

रिझर्व्ह बँकेच्या नियमांनुसार, जर तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डचे बिल ड्यू डेटनंतर पुढील 3 दिवसांसाठी भरले तर तुम्हाला कोणताही दंड भरावा लागणार नाही. यासोबतच त्याचा तुमच्या क्रेडिट स्कोअरवर परिणाम होणार नाही. अशा परिस्थितीत, जर तुम्ही क्रेडिट कार्डचे बिल एका महिन्यात ड्यू डेटला भरण्यास विसरलात किंवा वेळेवर पैशांची व्यवस्था केली नाही, तर तुम्हाला 3 दिवस काळजी करण्याची गरज नाही.

इंटरनेट नसतानाही कळेल लाइव्ह लोकेशन, हे अ‍ॅप देणार अचूक माहिती, फक्त करा हे काम!

संबंधित बातम्या

एवढा भरावा लागेल दंड

ड्यू डेटच्या 3 दिवसांनंतरही तुम्ही क्रेडिट कार्डचे बिल भरले नाही, तर कंपनी तुमच्याकडून दंड आकारेल. दंडाची रक्कम तुमच्या क्रेडिट कार्ड बिलावर अवलंबून असते. जर तुमचे बिल जास्त असेल तर तुम्हाला जास्त दंड भरावा लागू शकतो. बिल कमी असेल तर त्यानुसार कमी दंड भरुन तुमचं काम होईल. उदाहरणार्थ, स्टेट बँक 500 ते 1,000 रुपयांच्या बिलावर 400 रुपये दंड आकारते. त्याच वेळी, 1,000 ते 10,000 रुपयांच्या रकमेसाठी 750 रुपये आणि 10,000 ते 25,000 रुपयांच्या बिलासाठी 950 रुपये दंड आकारला जातो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या