JOIN US
मराठी बातम्या / मनी / Electricity Consumers Rights: लाइट गेल्यावरही मिळू शकते भरपाई, सरकारचा नेमका नियम काय?

Electricity Consumers Rights: लाइट गेल्यावरही मिळू शकते भरपाई, सरकारचा नेमका नियम काय?

Electricity Consumers Rights: कोणतीही वस्तू खरेदी करताना आपली कोणी फसवणूक केली तर त्याची तक्रार करता येते हे तुम्हाला माहिती असेल. पण लाइट जास्त वेळी गेली म्हणून तुम्ही तक्रार करु शकता आणि तुम्हाला भरपाई मिळते याविषयी तुम्हाला माहिती आहे का?

जाहिरात

वीज ग्राहकांचे अधिकार

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 3 जुलै : पावसाळा सुरु झाला की, लाइट जाण्याचं प्रमाणं वाढतं. अशा वेळी आपल्याला अनेक समस्यांचा सामना करावा लागत असतो. पण विज ग्राहकांनो तुम्हाला तुमचे अधिकार माहिती आहेत का? कारण विज गेली तर तुम्हाला नुकसान भरपाई मिळू शकते. ती कशी आणि त्याचा नेमका नियम काय आहे याविषयी सविस्तर आज आपण जाणून घेणार आहोत. विद्यूत कंपनी कोणतीही पूर्वसूचना न देता विद्यूत पुरवठा खंडीत करु शकत नाही. कोणतीही सूचना न मिळता जर शहरी भागांमध्ये 4 तासांपेक्षा अधिक काळ विद्युत पुरवठा खंडी राहिला तर प्रभावित झालेले ग्राहक विद्युत कंपनीकडे नुकसान भरपाईची मागणी करु शकतात. Anniversary of GST: मोबाईल-फ्रिजसह अनेक गृहउपयोगी वस्तूंवरील GST सरकारने कमी केला का? पूर्ण प्रकरण काय? तक्रार केल्यानंतर काय? विद्युत ग्राहकांची तक्रार सोडवण्यासाठी तक्रार निवारण मंच कायद्यातील तरतुदींनुसार प्रत्येक मंडल क्षेत्रामध्ये निवारण केंद्राची स्थापना केलेली असते. स्थानिक पातळीवर तक्रारीचं निवारण झालं नाही तर विद्युत ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे तक्रार दाखल करु शकतात. यासोबतच प्रत्येक लाइट बिलावर तक्रार निवारण केंद्राचा पत्ता देखील दिलेला असतो. WhatsApp पेमेंट करुनही मिळवता येईल इन्शुरन्स, पाहा कोण देतंय ही सुविधा! यासाठी काही फिस लागते का? ग्राहकांना आपल्या समस्या मांडण्यासाठी आणि तक्रार करण्यासाठी कोणतीही फिस आकारली जात नाही. ग्राहक स्वतःहा याविषयी तक्रार चालवू शकतो. या प्रकरणाचा निकाल दोन महिन्यांच्या आत देणं बंधनकारक असतं. यासोबतच ग्राहकांना बिल सोपल्याची तारीख आणि दंडाशिवाय बिल बरण्याची तारीख यांच्यात 21 दिवसांचं अंतर असायला हवं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या