जगातील सर्वात महागडी बॉटल
मुंबई, 5 मे: पाण्याची बॉटल ही आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग असते. कारण घरातील थंड पाणी प्यायचो असो, ऑफिसला पाणी न्यायचो असो किंवा प्रवासाला. सगळीकडे बॉटल खूप उपयुक्त असते. मार्केटमध्ये प्लास्टिकपासून ते स्टील, काच, तांब्यापर्यंतच्या सर्वच बॉटल्स उपलब्ध असतात. त्यांची किंमत देखील स्टँडर्डच्या हिशोबाने 100 ते 1000 रुपयांपर्यंत बदलत राहते. पण आज आम्ही तुम्हाला अशा पाण्याच्या बाटलीबद्दल सांगणार आहोत ज्याची किंमत हजार नाही तर लाखो रुपये आहे. अखेर या बाटलीत असे काय आहे ज्याने सर्वात महागडी बाटली म्हणून गिनीज बुकमध्ये नाव नोंदवले आहे.
Acqua di Cristallo Tributo a Modigliano नावाची ही बाटली गेल्या 13 वर्षांपासून जगातील सर्वात महागडी आणि फॅशनेबल पाण्याची बाटली म्हणून ओळखली जाते. या बाटलीची 2010 पासून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद आहे.
या बॉटलमध्ये फक्त 750 मिली पाणी भरलेलं आहे. ज्याची किंमत 50 लाख रुपये आहे. या बॉटलच्या खास पॅकेजिंग आणि डिझाइनमुळे या बॉटलला एवढी किंमत आहे. खरंतर ही बॉटल 24 कॅरेट शुद्ध सोन्याची बनलेली आहे आणि त्यात भरलेल्या पाण्यात 5 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचाही समावेश आहे. एवढेच नाही तर त्यात भरलेले पाणी हे पृथ्वीवरील सर्वात शुद्ध पाणी आहे. हे आइसलँड, फिजी आणि फ्रान्सच्या हिमनद्यांमधून आणले गेले आहे.
गोल्ड खरेदी करताना फक्त हॉलमार्क नाही, तर बिलमधील ‘या’ गोष्टी करा चेक; अन्यथा होईल फसवणूकबॉटलची रचना डिझायनर फर्नांडो अल्तामिरानो यांनी केली आहे, जे त्यांच्या क्लासिक डिझाइनसाठी जगप्रसिद्ध आहेत. त्यांच्या खास आणि क्लासिक डिझाइनमुळे, 2010 मध्ये, या बाटलीला लिलावात 60 हजार डॉलर्स (48.60 लाख रुपये) पर्यंत बोली लावण्यात यश आले. या बाटलीला तिच्या डिझाइनसाठी पुरस्कारही मिळाला आहे.
1500 रुपयांपेक्षाही कमी किंमतीत मिळतो मिनी कूलर, काही मिनिटांत थंडगार होईल घरTributo Modigliani ही जगातील एकमेव अशी बाटली आहे. ही बॉटल सोन्याव्यतिरिक्त प्लॅटिनम आणि हाय क्वालिटी डायमंडने बनवले आहे. अल्तामिरानो या फाऊंडेशनने सामाजिक कार्यासाठी 5 लाख युरोही दिले आहेत. या बाटलीचे डिझाइन एक प्रकारचे शिल्प आहे, जे खूप सुंदर दिसते.