कंपनीच्या शेअर्सने घातला धुमाकूळ
मुंबई, 15 जुलै: शेअर बाजारातील गुंतवणूक अत्यंत जोखीमीची मानली जाते. त्यामुळे अनेकजण त्यापासून लांब राहणंच पसंत करतात. मात्र शेअर बाजारातील मोठी उलाढाल डोळे पांढरे करणारी आकडेवारी नेहमीच आकर्षणाचा विषय आहे. त्यामुळे शेअर बाजाराची वरवरची का होईना माहिती ठेवणे प्रत्येकालाच आवडतं. शेअर बाजारातील मोठ्या कंपन्यांची शेअर सर्वांनाच माहिती आहेत. मात्र सर्वात महागडा शेअर कोणता विचारलं तर कदाचित सांगता येणार नाही. MRF कंपनीचा स्टॉक भारतीय शेअर बाजारातील सर्वात महाग शेअर आहे. त्यांची किंमत आज 78000 रुपयांवर आहे. मात्र ही किंमत वाचून तुम्हाच्या तोंडून बापरे निघालं असेल तर थांबा. कारण जगातील सर्वात महागड्या शेअरची किमत 3.33 कोटी आहे. या कंपनीचं नाव नाही तुम्ही कदाचित ऐकलं नसेल पण कंपनीच्या मालकाचं नाव तुम्ही नक्कीच ऐकलं असेल. बर्कशायर हॅथवे इंक (Berkshire Hathaway Inc) हा जगातील सर्वात महाग स्टॉक आहे. या कंपनीच्या एका शेअरची किंमत सध्या 3.33 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. या एका शेअरमध्ये तुम्ही घर, गाडी किंवा अलिशान आयुष्य जगू शकता. आज तकने याबाबतचं वृत्त दिलं आहे. आता तुम्हाला या कंपनीचे मालक कोण प्रश्न पडला असेल? वॉरन बफे यांना अवघं जग आज ओळखतं. वॉरेन बफे हे बर्कशायर हॅथवे इंक या जगातील सर्वात महागड्या स्टॉक असलेल्या कंपनीचे मालक आहेत. वॉरन बफेंची कंपनीतील 16 टक्के भागीदारी आहे. कंपनीत सुमारे 3,72,000 कर्मचारी काम करतात. ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’च्या ग्राहकांचं खर्चाचं बजेट बिघडणार? बँकेने व्याजदर वाढवल्याने EMI वाढणार बर्कशायर हॅथवे शेअरची किंमत बर्कशायर हॅथवे इंक. स्टॉकची किंमत सध्या 4,17,250 डॉलर म्हणजेच 3,33,43,907 रुपये आहे. यावर्षी 20 एप्रिल रोजी या शेअरची किंमत 523550 डॉलर म्हणजे 4,00,19,376 रुपयांवर पोहोचली होती. मागील तीन महिन्यांत हा स्टॉक सुमारे 20 टक्क्यांनी घसरला आहे. Post Office Scheme: दररोज 50 रुपयांची बचत करा आणि मिळवा 35 लाख, पैसै बुडण्याची चिंताही नाही बर्कशायर हॅथवे कंपनीची Paytmमध्येही गुंतवणूक डिजिटल पेमेंट अॅप असलेल्या पेटीएम कंपनीमध्ये बर्कशायर हॅथवेने गुंतवणूक केली आहे. बर्कशायर हॅथवेची पेटीएम कंपनीत 2.41 टक्के भागिदारी आहे. तर Ant ग्रुपची कंपनीत 24.90 टक्के सर्वाधिक गुंतवणूक आहे. पेटीएमचे फाऊंडर विजय शेखर शर्मा यांची कंपनीत 8.90 टक्के भागिदारी आहे.