प्रातिनिधिक फोटो
मुंबई, 15 फेब्रुवारी: फक्त 3% व्हाईट-कॉलर जॉब करणाऱ्या लोकांना आठवड्यात 5 दिवस काम करण्यासाठी ऑफिसला जायची इच्छा आहे. तर बहुतेक जणांचं म्हणणं आहे की, जर बॉस त्यांना पूर्ण वेळासाठी कामावर रूजू होण्यासाठी सक्ती करणार असेल तर ते नोकरी सोडतील, असं मॅनेजमेंट कन्सल्टन्सी अॅडव्हान्स्ड वर्कप्लेस असोसिएट्सने (Advanced Workplace Associates – AWA) म्हटलं आहे. अॅडव्हान्स्ड वर्कप्लेस असोसिएट्सने एक सर्व्हे केला, ज्यामध्ये अशा प्रकारची माहिती समोर आली आहे. या फर्मने फायनान्स, टेक्नॉलॉजी आणि एनर्जी सेक्टरच्या जगभरातील जवळपास 10,000 लोकांना या सर्व्हेमध्ये सामील केलं होतं. या सर्व्हेमध्ये समोर आलेली सर्वांत मोठी गोष्ट म्हणजे नोकरदार एका आठवड्यात 5 दिवस ऑफिसमध्ये जाऊन काम करू इच्छित नाहीत. 86% कर्मचाऱ्यांनी सांगितलं की, त्यांना पाच दिवसांपैकी कमीत कमी दोन दिवस वर्क फ्रॉम होम (Work From Home) ची सुविधा मिळाली पाहिजे. प्रत्येक वयोगटातील कर्मचाऱ्यांचं हेच मत जर तुम्ही विचार करत असाल की, एखाद्या खास वयोगटातील नोकरदारांना असं वाटतंय तर तुम्ही चुकत आहात. जवळपास प्रत्येक वयोगटाच्या कर्मचाऱ्याचं हेच म्हणणं असल्याचं समोर आलंय. कर्मचाऱ्यांना वाटतं मंगळवार, बुधवार आणि गुरुवार हे तीन दिवस ते ऑफिसला येतील. आठवड्याचे बाकी दिवस ऑफिस रिकामं राहिल्यास त्यांना काहीच प्रॉब्लेम नाही. हे वाचा- एअर इंडियाचे नवीन CEO इल्कर आयची यांच्याविषयी वाचून व्हाल थक्क! दोन वर्षाच्या दीर्घ कोविड लॉकडाउननंतर आता अनेक बँकांनी फ्लेक्सिबल वर्किंगसाठी तयारी केली आहे. यामध्ये सिटी ग्रुप आयएनसी. (Citigroup Inc.), एचएसबीसी होल्डिंग्स पीएलसी (HSBC Holdings Plc) आणि नेटवेस्ट ग्रुप पीएलसी (NatWest Group Plc) सारख्या कंपन्यांचा समावेश आहे. काही फिनटेक कंपन्या जसं की, रिवॉल्ट लिमिटेड (Revolut Ltd.) आणि ईगन टेक्नॉलॉजीज लिमिटेड (Eigen Technologies Ltd.) यांनी तर आपल्या स्टाफला पूर्णपणे घरून काम करण्यास परवानगी द्यायला सुरूवात केली आहे. AWA च्या मॅनेजिंग डायरेक्टर अँड्र्यू मॉसनने आपल्या स्टेटमेंटमध्ये म्हटलं आहे की, ‘नोकरी देणाऱ्या कंपन्यांना आता हे समजून घ्यावं लागेल की, जिनी आता बाटलीच्या बाहेर आला (अर्थात असं काहीतरी घडणं ज्यामुळे लोकांच्या आयुष्यात कायमचा बदल झाला आहे) आहे. कर्मचाऱ्यांनी पाहिलं आहे की, फ्लेक्सिबिलिटीने (Flexibility) काम करता येऊ शकतं आणि जे बॉस त्यांच्याशी कठोर वागत होते, त्यांना आता नुकसान होईल.’ हे वाचा- क्रूड ऑइल 7 वर्षांच्या सर्वोच्च स्तरावर, Petrol Diesel दरावर काय परिणाम? मग तुमची काय इच्छा आहे? आठवड्यातले 5 ही दिवस ऑफिसमध्ये जाऊन काम करायचं की, 3 दिवस ऑफिस आणि 2 दिवस वर्क फ्रॉम होम करायचंय. कारण आता काही दिवसांतच ऑफिसेस सुरू होणारचं आहेत.