JOIN US
मराठी बातम्या / मनी / विप्रो कंपनीने 300 कर्मचाऱ्यांना काढलं, शेअर बाजारात बसणार का मोठा फटका?

विप्रो कंपनीने 300 कर्मचाऱ्यांना काढलं, शेअर बाजारात बसणार का मोठा फटका?

कामाचे तास संपल्यानंतर हे कर्मचारी दुसऱ्या कंपनीत काम करायचे. अशा ३०० कर्मचाऱ्यांवर कंपनीने कारवाई केली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई : विप्रो कंपनीने ३०० कर्मचाऱ्यांना नारळ देऊन घरी पाठवलं आहे. या ३०० कर्मचाऱ्यांनी कंपनीच्या एकात्मतेसोबत दगाफटका केल्याचा दावा कंपनीचे चेअरमन ऋषद प्रेमजी यांनी केला. कामाचे तास संपल्यानंतर हे कर्मचारी दुसऱ्या कंपनीत काम करायचे. अशा ३०० कर्मचाऱ्यांवर कंपनीने कारवाई केली आहे. अशा कर्मचाऱ्यांना कंपनीत कोणतेही स्थान नाही असं प्रेमजी म्हणाले. कंपनीला धोका दिल्याचं त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे. या घटनेचा शेअर मार्केटवरही परिणाम झाला आहे. शेअर मार्केटमध्ये विप्रोचे शेअर्स सध्या कोसळले आहेत. Infosys Ltd आणि Tech Mahindra Ltd सह प्रतिस्पर्धी आयटी कंपन्यांसाठी एकाच वेळी काम करत असल्याचे आढळून आल्याने विप्रो लिमिटेडने 300 कर्मचारी काढून टाकले,बडतर्फ केलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना तीन वर्षांपेक्षा कमी कामाचा अनुभव होता. इन्फोसिसने या महिन्याच्या सुरुवातीला आपल्या कर्मचार्‍यांना देखील अशा प्रकारे वर्तन केल्यानं ईमेलद्वारे चेतावनी दिली होती.

या सगळ्यानंतर आयटी कंपन्यांचे शेअर शेअर मार्केटमध्ये कोसळतात की नाही. लाँग टर्मसाठी हे शेअर घ्यावे की नाही हे देखील पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. आज ०.३५ टक्क्यांनी शेअर आपटल्याचं दिसत आहे. मार्केटमध्ये विप्रोचे शेअर्स पुन्हा वाढणार का? याकडेही गुंतवणूकदारांचं लक्ष लागलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या