मुंबई, 25 एप्रिल : सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजना (Public Provident Fund) 2019 अंतर्गत, कोणतीही व्यक्ती आपले सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) खाते उघडू शकते. तुम्ही तुमच्या अल्पवयीन मुलांच्या नावाने PPF खाते देखील उघडू शकता. आता प्रश्न असा येतो की ज्या पगारदार लोकांचा पगार जास्त आहे, ते आपल्या अल्पवयीन मुलांच्या नावाने पीपीएफ खाते उघडून कर सवलतीचा (Tax Benefits) लाभ घेऊ शकतात का? या संदर्भात त्यांना आयकर नियमांची माहिती असणे आवश्यक आहे. नियम काय आहे? सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजना, 2019 अंतर्गत, PPF खात्यात वार्षिक 1.50 लाख रुपयांपर्यंतच्या योगदानावर कर सूट उपलब्ध आहे. अल्पवयीन मुलांच्या पीपीएफ खात्यात केलेल्या योगदानाचाही यात समावेश आहे. दुसऱ्या शब्दांत, जर तुम्ही तुमच्या अल्पवयीन मुलांचे पीपीएफ खाते उघडले असेल, तर तुमच्या आणि त्या मुलांच्या खात्यांमध्ये केलेले एकूण योगदान 1.50 लाख रुपयांच्या मर्यादेपेक्षा जास्त नसावे. या मर्यादेपर्यंत केलेल्या गुंतवणुकीतून मिळालेले उत्पन्न कर सूट मिळण्यास पात्र आहे. Multibagger Share: एक लाखांची गुंतवणूक बनली 10 लाख, तुमच्याकडे आहे का ‘हा’ शेअर? तुमच्या उत्पन्नात व्याज जोडले जाईल अल्पवयीन मुलाच्या PPF खात्यातून मिळणारे उत्पन्न (अपंग असलेले अल्पवयीन वगळता) पालकांच्या उत्पन्नात जोडले जाते. आयकराच्या कलम 10(11) च्या तरतुदींनुसार, PPF खात्यातून मिळणाऱ्या व्याजासह वार्षिक 5 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करपात्र नाही. जर तुम्ही अल्पवयीन मुलांसाठी पीपीएफ खाते उघडले असेल, तर त्या खात्यातून मिळणारे व्याज तुमच्या आयकर रिटर्नमध्ये नमूद करणे आवश्यक आहे. बँकेचं लोन लवकरात लवकर फेडायला मदत करेल प्रीपेमेंट पद्धत; व्याजही वाचेल आणि टेन्शनही कमी होईल जर तुमची पत्नी देखील करदात्या असेल तर ती तिच्या वैयक्तिक उत्पन्नातून वार्षिक 1.50 लाख रुपये पीपीएफ खात्यात जमा करू शकते. त्यांना यावर कर सवलतही मिळेल, मात्र त्यासाठी त्यांना वैयक्तिक आयकर विवरणपत्र भरावे लागेल.