JOIN US
मराठी बातम्या / मनी / सध्याच्या काळात इन्शुरन्स का गरजेचा आहे? कोणते इन्शुरन्स घेतलेच पाहिजे? चेक करा डिटेल्स

सध्याच्या काळात इन्शुरन्स का गरजेचा आहे? कोणते इन्शुरन्स घेतलेच पाहिजे? चेक करा डिटेल्स

आज प्रत्येक गोष्टीचा विमा उतरवला जात आहे. आरोग्य आणि सामान्य विम्यातच (Health and General Insurance) शेकडो प्रोडक्ट्स आहेत. परंतु येथे आम्ही त्या विमा प्रोडक्ट्सबद्दल सांगत आहोत, जे कुटुंबासाठी आवश्यक आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 3 जानेवारी : कोरोना महामारीमुळे (Corona Crises) लोकांना विम्याचे महत्त्व समजले आहे. बरेच लोक विम्याला फालतू खर्च मानत होते, पण आता तसे राहिले नाही. गेल्यावर्षी कोरोनाच्या कहरानंतर विमा कंपन्यांच्या (Insurance Companies) व्यवसायात कमालीची तेजी आली आहे. विमा खरेदी करणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे. विमा कंपन्यांनीही त्यांच्या उत्पादनांच्या किमती वाढवल्या आहेत. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत (Emergency Situation), विशेषत: आर्थिक परिस्थितीत विमा हा एक मजबूत आधार आहे. विमा आपल्या कुटुंबाला भविष्यात कोणत्याही अप्रिय घटनेला तोंड देण्याचे सामर्थ्य देत असताना, बचतीचा मोठा आधार देखील आहे. बरेच लोक फक्त बचतीसाठी विमा पॉलिसी घेतात. मात्र येथे आपण हे समजून घेतले पाहिजे की गुंतवणूक आणि विमा या दोन्ही भिन्न गोष्टी आहेत. गुंतवणुकीसाठी विमा उतरवून, तुम्हाला अपेक्षित परतावा मिळत नाही. विमा बाजारही विस्तारला आहे. आज प्रत्येक गोष्टीचा विमा उतरवला जात आहे. आरोग्य आणि सामान्य विम्यातच शेकडो प्रोडक्ट्स आहेत. परंतु येथे आम्ही त्या विमा प्रोडक्ट्सबद्दल सांगत आहोत, जे कुटुंबासाठी आवश्यक आहेत. टर्म इन्शुरन्स (Term Insurance) घरच्या प्रमुखासाठी टर्म इन्शुरन्स असणे अत्यंत आवश्यक आहे. टर्म इन्शुरन्स कमावणाऱ्या व्यक्तीच्या अनुपस्थितीत सुरुवातीला अवलंबून असलेल्या लोकांना आर्थिक सहाय्य प्रदान करतो. टर्म इन्शुरन्स जितका लवकर केला जाईल तितका प्रीमियम कमी आणि कव्हरेज जास्त असते. आजच्या गरजेनुसार कुटुंबप्रमुखाचा किमान एक कोटी रुपयांचा टर्म इन्शुरन्स असायला हवा. Business Idea: महिन्याकाठी 1 लाख रुपये कमवायची सुवर्णसंधी, फक्त 50 हजारांमध्ये सुरु करा हा व्यवसाय आरोग्य विमा पॉलिसी (Health Insurance) वैद्यकीय खर्च वाढत असल्याने आरोग्य विमा खूप महत्त्वाचा बनला आहे. कुटुंबातील प्रत्येक सदस्याचा आरोग्य विमा असावा. फॅमिली फ्लोटर पॉलिसीमध्ये संपूर्ण कुटुंब देखील समाविष्ट केले जाऊ शकते. चांगल्या आरोग्य विमा पॉलिसीमध्ये डॉक्टरांचे सल्ला शुल्क, वैद्यकीय चाचण्या, हॉस्पिटलायझेशन खर्च आणि ऑपरेशन्स इत्यादींचा खर्च समाविष्ट असतो. मोटर विमा (Motor Insurance) जर तुम्ही कार किंवा दुचाकी चालवत असाल तर वाहनांचा विमा आवश्यक आहे. म्हणून, थर्ड पार्टी इन्शुरन्स सोबत सर्वसमावेशक मोटर विमा संरक्षण घेणे आवश्यक आहे. या विम्याचे दरवर्षी नूतनीकरण करावे लागते. अपघात विमा (Accidental Insurance) अपघाती मृत्यूमुळे कुटुंबाचे आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी प्रधानमंत्री सुरक्षा विमा मदत करते. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत 2 लाख रुपयांचे विमा संरक्षण उपलब्ध आहे. ते बँकेतील बचत खात्याशी जोडलेले आहे. विम्याच्या प्रीमियमसाठी 12 रुपये दरवर्षी बँक खात्यातून कापले जातात. नवीन वर्षात शेअर बाजार तेजीत; सेन्सेक्स 929 तर निफ्टीत 271 अंकांची वाढ गृह विमा (Home Insurance) आजकाल नैसर्गिक घटनाही वाढल्या आहेत. चोरीच्या घटनाही मोठ्या प्रमाणात होऊ लागल्या आहेत. अशा स्थितीत गृहविमाही असायला हवा. गृह विम्याद्वारे, तुम्ही आग, चोरी आणि नैसर्गिक आपत्तींमुळे होणारे नुकसान भरून काढू शकता. सायबर विमा (Cyber Insurance) आपण डिजिटल होत असताना सायबर फसवणुकीच्या घटनाही झपाट्याने वाढत आहेत. आपल्या रोजच्या जीवनातील लेखाजोखा मोबाईल, लॅपटॉपमधील डेटाच्या रूपाने सायबर विश्वात तरंगत असतो. त्यात कोणीही घुसू शकतो. त्यामुळे, तुमच्या बँक खात्यांचे रक्षण करण्यासाठी, क्रेडिट कार्डचा गैरवापर टाळण्यासाठी, एखाद्याने सायबर विमा संरक्षण देखील निवडले पाहिजे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या