गोल्ड लोन आहे बेस्ट
मुंबई, 12 फेब्रुवारी: आयुष्यात अनेक वेळा असे प्रसंग येतात जेव्हा आपल्याला अचानक पैशाची गरज भासते. अशा परिस्थितीत अनेक वेळा बचतही कमी पडते. अशा वेळी आपण कर्ज घेम्याचा विचार करतो. अशा वेळी घरातील सोने ठेवून तुम्ही सहज गोल्ड लोनमिळवू शकता. भारतात सोन्यात गुंतवणूक करणे खूप फायदेशीर मानले जाते. एक काळ असा होता, जेव्हा अचानक पैशाची गरज भासल्यावर लोक सोने विकायचे. पण आता बँका सोन्याच्या बदल्यात गोल्ड लोन सहज देतात. आपल्या सर्वांना माहित आहे की बँक गोल्ड लोनमध्ये गँरंटी म्हणून सोने गहाण ठेवले जाते. या प्रकारचे कर्ज मिळवण्यात कमी त्रास होतो. आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत की आपत्कालीन परिस्थितीत सोने घेणे फायदेशीर का आहे याविषयी माहिती देणार आहोत.
क्रेडिट कार्ड वापरता ना? मग कधीच करु नका ‘या’ 3 चुका, होऊ शकते नुकसानबहुतेक बँका त्यांच्या ग्राहकांना तारण कर्ज सहज देतात. अशा परिस्थितीत गोल्ड लोन घेणे खूप सोपे आहे. तुम्ही तुमच्या सोन्याच्या मूल्याच्या 75% पर्यंत कर्ज कोणत्याही अडचणीशिवाय मिळवू शकता. या कर्जाची खास गोष्ट म्हणजे ते मिळवण्यासाठी तुम्हाला उत्पन्नाच्या पुराव्याची गरज नाही. फक्त सोने देऊन तुम्ही हे कर्ज सहज मिळवू शकता.
क्रेडिट कार्ड वापरता ना? मग कधीच करु नका ‘या’ 3 चुका, होऊ शकते नुकसानगोल्ड लोन हे सुरक्षित कर्ज मानले जाते, ज्यामुळे बँका या कर्जावर कमी व्याजदर आकारतात. पर्सनल लोन, बिझनेस लोन, कॉर्पोरेट लोन इत्यादींसारख्या जोखमीच्या कर्जांवर बँका 15 ते 30 टक्के व्याजदर आकारतात. दुसरीकडे, बँक सामान्यतः सोने कर्जावर 7 ते 10 टक्के व्याज दर आकारते.
गोल्ड लोनवर ग्राहकांना सहसा जास्त कर्ज मिळते. अनेकवेळा जेव्हा लोकांना अचानक पैशांची गरज भासते तेव्हा त्यांना सर्वात मोठी समस्या निर्माण होते ती म्हणजे त्यांना आवश्यक तेवढे कर्ज मिळू शकत नाही. अशा परिस्थितीत, गोल्ड लोन हे बेस्ट ठरते. कारण यामध्ये गुंतवणूकदारांना ठेवलेल्या सोन्याच्या मूल्याच्या 75 टक्क्यांपर्यंत रक्कम सहज मिळू शकते. जे इतर कर्जांच्या तुलनेत खूप जास्त आहे. यासोबतच या कर्जावर तुम्हाला सहज रिपेमेंट ऑप्शन मिळतात. अशा प्रकारे, तुम्ही तुमच्या गरजेनुसार या कर्जाच्या परतफेडीचा पर्याय निवडू शकता.