JOIN US
मराठी बातम्या / मनी / ट्विटरच्या कर्मचाऱ्यांना 'या' कारणामुळे नारळ, एलन मस्क यांच्या मनात नक्की चाललंय काय?

ट्विटरच्या कर्मचाऱ्यांना 'या' कारणामुळे नारळ, एलन मस्क यांच्या मनात नक्की चाललंय काय?

मस्क यांनी आणखी एक मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती समोर आली आहे. या माहितीनुसार कंपनीमध्ये कर्मचारी कपात केली जाणार आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

 ghमुंबई: जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती असलेल्या एलॉन मस्क यांनी ट्विटर ही मायक्रोब्लॉगिंग साईट विकत घेतली आहेत. कंपनी ताब्यात येताच ट्विटर चे नवीन मालक एलन मस्क यांनी बदल करण्याचा धडाका सुरू केला आहे. कंपनीचं प्रमुखपद हातात येताच त्यांनी सर्वांत अगोदर ट्विटरच्या कार्यकारिणीमध्ये मोठे बदल केले आहेत. सीईओ पराग अग्रवाल यांच्यासह अनेक उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना त्यांनी पदावरून काढून टाकलं आहे. त्यानंतर त्यांनी आपल्या इतर कर्मचाऱ्यांना डेडलाइन्ससह नवनवीन कामं असाइन करण्यास सुरुवात केली. मस्क यांनी आणखी एक मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती समोर आली आहे. या माहितीनुसार कंपनीमध्ये कर्मचारी कपात केली जाणार आहे. न्यूयॉर्क टाइम्सनं दिलेल्या वृत्तानुसार, ट्विटरच्या जगभरातील सुमारे सात हजार 500 हून अधिक कर्मचाऱ्यांना एलॉन मस्क बाहेरचा रस्ता दाखवू शकतात. एलॉन मस्क यांनी गेल्या आठवड्यात 44 अब्ज डॉलर्सचा करार पूर्ण केला. ही पर्चेसिंग डील पूर्ण झाल्यानंतर, मस्क यांनी गेल्या आठवड्यात ट्विटरचा कारभार हातात घेतला. तेव्हापासून सध्याच्या कर्मचाऱ्यांना ते कामावरून काढून टाकतील, अशी अटकळ होती. जगातील सर्वात श्रीमंत असलेल्या एलन मस्क यांनी ट्विटरसोबतच्या करारनंतर त्याची किंमत कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. ट्विटरमधील कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यास आजपासून सुरुवात केली आहे. मस्क यांना कंपनीच्या पायाभूत सुविधांचा खर्च कमी करून सुमारे 1 अब्ज 82 अब्ज डॉलरची बचत करायची आहे.

आताच चेक करा नोकरी राहिली की गेली! ट्विटर कर्मचाऱ्यांना कंपनीकडून Email

माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, ट्विटरच्या कर्मचार्‍यांना दिवस उजाडताच ई-मेल आले आहेत. कामावरून कमी केलं जात असल्याची माहिती या मेलद्वारे त्यांना देण्यात आली आहे. मस्क यांनी कर्मचाऱ्यांना केलेल्या मेलनुसार, कंपनीमध्ये सुधारणा करण्यासाठी पावलं उचलली जात आहेत. त्यानुसार कर्मचाऱ्यांसाठी कंपनीतील प्रवेश बंद करण्यात येत असून, बॅज अॅक्सेसही सस्पेंड करण्यात आला आहे. मेलमध्ये काय सांगण्यात आलं? CNBC आवाजने याबाबत वृत्त दिलं आहे. ट्विटरने जारी केलेल्या मेलमध्ये कर्मचाऱ्यांना सांगण्यात आलं आहे की, ‘आम्ही जागतिक कर्मचारी संख्या कमी करण्याच्या कठीण प्रक्रियेतून जात आहोत. प्रत्येक कर्मचाऱ्याची तसंच ट्विटर सिस्टम आणि ग्राहकांच्या डेटाची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी कार्यालयात प्रवेश मर्यादित केला जात आहे.’

ट्विटरवर ‘ब्लू टिक’साठी पैसे द्यावे लागल्यास वापरकर्त्यांसाठी Koo ठरेल का नवं ‘घरटं’? काय सांगतात तज्ज्ञ?

संबंधित बातम्या

ब्लूमबर्गच्या वृत्तानुसार, सूत्रांनी सांगितलं की, कामावरून काढण्यात येणार्‍या कर्मचाऱ्यांची यादी तयार करण्याची जबाबदारी ट्विटरमधील वरिष्ठ कर्मचार्‍यांना दिली होती. टेस्ला इंजिनीअर्सना ट्विटरमध्ये सल्लागार म्हणून आणण्याचा विचार एलॉन मस्क करत आहेत. जेणेकरून ट्विटरमधील मिडल मॅनेजर्स आणि इंजिनीअर्सच्या संख्येत कपात करता येईल, अशी माहिती काही दिवसांपूर्वीच समोर आली होती. आता कर्मचाऱ्यांना मिळालेल्या मेलमुळे या माहितीमध्ये तथ्य असल्याचं स्पष्ट झालं आहे. क्रिप्टोकरन्सी प्लॅटफॉर्म  Binance नं एलॉन मस्क यांच्या कंपनी अधिग्रहणामध्ये हातभार लावून ट्विटरमध्ये गुंतवणूक केली आहे. Binance चे मुख्य कार्यकारी अधिकारी, चांगपेंग झाओ यांनीही काही दिवसांपूर्वी ट्विटरमधील कर्मचारी कपातीबाबत सूचक वक्तव्य केलं होतं.

लिस्बनमधील वेब समिटवेळी झाओ म्हणाले होते, “कमी वर्कफोर्स अधिक योग्य वाटतो”. याशिवाय, ट्विटरच्या नवीन फीचर रोल आउटच्या संथ गतीवरही त्यांनी टीका केली होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या