JOIN US
मराठी बातम्या / मनी / Saving Account वर कोणती बँक किती व्याज देते? मोठ्या बँकांचे व्याजदर बघा

Saving Account वर कोणती बँक किती व्याज देते? मोठ्या बँकांचे व्याजदर बघा

बचत खात्यात ठेवलेल्या 5 लाख रुपयांपर्यंतचा DICGC अंतर्गत विमा उतरवला जातो. म्हणजे बँक बुडली तरी तुम्हाला 5 लाख रुपयांपर्यंतची रक्कम परत मिळू शकते.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 18 मार्च : बचत खाते (Saving Account) अल्पकालीन गुंतवणूकदारांसाठी (Short Term) अत्यंत उपयुक्त आहे, ज्यांना कोणत्याही वेळी पैशांची गरज भासू शकते. बचत खात्याचा सर्वात मोठा फायदा हा आहे की ते केवळ तुमच्या ठेवींवर व्याज देत नाही तर तुम्हाला कधीही पैसे काढण्याची परवानगी देते. तुम्ही एक गोष्ट देखील लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे तुम्हाला बचत खात्यावर (10,000 च्या वर) मिळणाऱ्या व्याजावर कर भरावा लागेल कारण ते इतर स्त्रोतांकडून मिळणारे उत्पन्न मानले जाते. बचत खात्यातील दैनंदिन शिल्लक आधारावर व्याज मोजले जाते आणि व्याज दर तिमाहीच्या शेवटी तुमच्या खात्यात हस्तांतरित केला जातो. बचत खात्यात ठेवलेल्या 5 लाख रुपयांपर्यंतचा DICGC अंतर्गत विमा उतरवला जातो. म्हणजे बँक बुडली तरी तुम्हाला 5 लाख रुपयांपर्यंतची रक्कम परत मिळू शकते. सध्या वेगवेगळ्या बँकांमधील बचत खात्यावर मिळणाऱ्या व्याजाबद्दल माहिती घेऊया. Investment Tips: मुलांच्या भविष्यासाठी गुंतवणुकीदरम्यान ‘या’ चुका टाळा, नुकसान होणार नाही स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) जर तुमचे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये बचत खाते असेल, तर बँक तुम्हाला शून्य शिल्लक वर खाते ठेवण्याची सुविधा देखील देते. तुम्हाला वार्षिक 2.75 टक्के व्याजदर देते. एचडीएफसी बँक (HDFC Bank) 2 फेब्रुवारी 2022 नंतर, HDFC बँक आपल्या बचत खात्यातील ग्राहकांना वेगवेगळ्या रकमेवर व्याजदर देत आहे. तुम्ही 50 लाख रुपयांपेक्षा कमी ठेवल्यास तुम्हाला वार्षिक 3 टक्के व्याज मिळेल. 50 लाखांपेक्षा जास्त आणि 1000 कोटींपेक्षा कमी रकमेवर 3.50 टक्के आणि 4.50 टक्के व्याज दिले जाते. Aadhar Card मध्ये वारंवार बदल करता येत नाही, वाचा कोणते बदल किती वेळा करता येतील? आयसीआयसीआय बँक (ICICI Bank) ICICI बँक, सर्वात मोठ्या खाजगी बँकांपैकी एक आहे जी 50 लाखांपेक्षा कमी ठेवींवर 3 टक्के आणि 50 लाखांपेक्षा जास्त ठेवींवर 3.50 टक्के व्याज देते. अॅक्सिस बँक (Axis Bank) 50 लाखांपेक्षा कमी ठेवींवर 3 टक्के वार्षिक 50 लाखांपेक्षा जास्त आणि 10 कोटींपेक्षा कमी ठेवीवर 3.50 टक्के वार्षिक तर 10 पेक्षा जास्त आणि 100 कोटींपर्यंतच्या ठेवींवर वार्षिक 3.50 टक्के दराने रेपो + (-0.65%) व्याज दिले जाते. पंजाब नॅशनल बँक (PNB) ही सरकारी बँक 10 लाखांपर्यंतच्या ठेवींवर 2.75 टक्के आणि सरकारी बचत खात्यात 10 लाखांपेक्षा जास्त ठेवींवर 2.80 टक्के व्याज देते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या