JOIN US
मराठी बातम्या / मनी / 3 वर्षांच्या FD वर सर्वाधिक व्याज कुठं मिळेल? वाचा टॉप बँकांची यादी

3 वर्षांच्या FD वर सर्वाधिक व्याज कुठं मिळेल? वाचा टॉप बँकांची यादी

सध्या देशातील पाच बँका अशा आहेत, ज्या आपल्या ग्राहकांना तीन वर्षांच्या एफडीवर सर्वाधिक व्याज देत आहेत.

जाहिरात

3 वर्षांच्या FD वर सर्वाधिक व्याज कुठं मिळेल? वाचा टॉप बँकांची यादी

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 14 नोव्हेंबर: पैशांची बचत आणि गुंतवणूक ही काळाची गरज आहे. त्यासाठी बँकांमध्ये विविध पर्याय उपलब्ध आहेत. गुंतवणुकीसाठी बहुतेक लोक मुदत ठेवीला म्हणजेच एफडीला प्राधान्य देताना दिसतात. एफडीमध्ये चांगल्या व्याज दरांव्यतिरिक्त इतरही अनेक फायदे मिळतात. त्यामुळे बचतीसाठी एफडी हा सर्वात लोकप्रिय पर्याय झाला आहे. गेल्या काही महिन्यांत भारतीय रिझर्व्ह बँकेनं (आरबीआय) रेपो दरात मोठी वाढ केली आहे. त्यानंतर देशातील सर्व प्रमुख बँकांनी नवीन ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एफडीचे व्याजदर अनेकदा वाढवले आहेत. त्यामुळे एफडीमध्ये गुंतवणूक करणं पुन्हा एकदा फायदेशीर ठरत आहे. सध्या देशातील पाच बँका अशा आहेत, ज्या आपल्या ग्राहकांना तीन वर्षांच्या एफडीवर सर्वाधिक व्याज देत आहेत. महागाई कमी करण्यासाठी आरबीआय रेपो दरात वाढ करत आहे. मे महिन्यापासून आतापर्यंत लेबर दरात एकूण 190 बेसिस पॉइंट्सनं वाढ झाली आहे. येत्या काळात त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. म्हणजेच एफडीवरील व्याजदरांमध्ये या पुढेही वाढ सुरू राहू शकते. कोरोनानंतर बँकांनी एफडीवरील व्याजदरांत लक्षणीय कपात केली होती. मात्र, त्यामध्ये आता वाढ होऊ लागली आहे. सध्या देशातील पाच बँका आपल्या ग्राहकांना तीन वर्षांच्या एफडीवर सर्वाधिक व्याज देत आहेत. गुंतवणूकदारांसाठी ही चांगली बातमी आहे. तीन वर्षांच्या एफडीवर सर्वाधिक व्याज देणाऱ्या बँका खासगी क्षेत्रातील डीसीबी बँक आणि एयू स्मॉल फायनान्स बँक आपल्या ग्राहकांना तीन वर्षे मुदतीच्या एफडीवर 7.5 टक्के दराने व्याज देत आहेत. तर, बंधन बँक, सिटी युनियन बँक आणि करूर वैश्य बँक तीन वर्षे मुदतीच्या एफडीवर 7 टक्के व्याज देत आहेत. हेही वाचा: डेबिट कार्डशिवाय करा ऑनलाईन पेमेंट, अवघ्या काही सेकंदात होईल काम ‘या’ बँकांमध्येही मिळतात चांगले व्याजदर बँकबाजार.कॉमनं दिलेल्या माहितीनुसार इतर काही खासगी बँकादेखील एफडीवर चांगले व्याजदर देत आहेत. विशेष म्हणजे त्या ठिकाणी सामान्य नागरिकांच्या तुलनेत ज्येष्ठ नागरिकांना वर्षाकाठी जास्त व्याज मिळत आहे. फिनकेअर स्मॉल फायनान्स बँकेत सामान्य ग्राहकांना एफडीवर सात टक्के तर ज्येष्ठ ग्राहकांना साडेसात टक्के व्याज मिळत आहे. केटीडीएफसी बँक सामान्य आणि ज्येष्ठ ग्राहकांना अनुक्रमे सात आणि सव्वा सात टक्के व्याज देत आहे. श्रीराम सिटी बँकेतील एफडीवर 7.76 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 8.24 टक्के व्याज मिळत आहे. महिंद्रा फायनान्स सामान्य व ज्येष्ठ नागरिकांना अनुक्रमे 7.25 आणि 7.50 टक्के, सुंदरम फायनान्स 7.07 आणि 7.39 टक्के, लक्ष्मी विलास बँक 6.25 आणि 6.75 टक्के, इक्विटास स्मॉल फायनान्स बँक 7.40 आणि 7.90 टक्के, कॅनरा बँक 6.50 आणि 7, पंजाब व सिंध बँक 6.10 आणि 6.60 टक्के व्याजदर देत आहेत.

एफडीवर अधिक व्याज मिळवण्याच्या टिप्स तुम्हाला एफडीवर अधिक व्याज हवे असल्यास ऑटो-रिन्युअल पर्याय टाळा. साधारणपणे, बँका मुदत ठेवींमध्ये गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकांना ऑटो-रिन्युअल पर्याय देतात. जर एखाद्या ग्राहकानं हा पर्याय निवडला, तर बँक मॅच्युरिटीच्या वेळी त्याच कालावधीसाठी एफडीचं प्रचलित व्याजदरासह नूतनीकरण करते. त्यामुळे, जस सध्याचे व्याजदर पूर्वीच्या व्याजदरांपेक्षा जास्त असल्यास गुंतवणूकदारांना तोटा सहन करावा लागतो. म्हणून, जेव्हा एफडीचा कार्यकाळ संपेल तेव्हा रिसर्च करा आणि कोणत्या बँकेत आणि कोणत्या कार्यकाळावर सर्वाधिक व्याज मिळत आहे ते शोधा. त्यानंतर गुंतवणूक करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या