JOIN US
मराठी बातम्या / मनी / मित्र-नातेवाईकांना कर्ज देताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर तुमचे पैसे बुडालेच समजा

मित्र-नातेवाईकांना कर्ज देताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर तुमचे पैसे बुडालेच समजा

कर्ज देतांना रोखीने व्यवहार करण्याऐवजी नेहमी बँक ट्रान्सफर पर्यायाचा वापर करावा. तसंही 20 हजारांच्या पुढचं कर्ज व्यवहार तर मानलाच जात नाही.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 11 जुलै : पैशांची गरज कुणाला कधी लागेल सांगता येत नाही. त्यामुळे मित्र किंवा नातेवाईक यांच्यात छोटे मोठे आर्थिक व्यवहार (Lending Money) होतच असतात. हे व्यवहार कायदेशीर (Legal Transaction) असतात मात्र असे व्यवहार करत असताना फसवणूक होऊ नये किंवा संबंध खराब होऊ नये याचीही काळजी घेतली पाहिजे. म्हणून असे व्यवहार करताना तज्ज्ञांच्या मते कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात यावर एक नजर टाकूया. मित्रांची ओळख किंवा नातेवाईकांसोबत असलेले संबंध लक्षात घेता अनेकदा आपल्या परिचित लोकांना कर्ज म्हणून काही पैसे देतो. मात्र समोरच्या व्यक्तीला राग येऊ नये म्हणून आपण त्याचा कायदेशीर पुरावा देखील घेत नाही. मात्र लीगल डॉक्युमेंट (Legal Documents) नसेल तर हे कर्ज गिफ्ट म्हणून ग्राह्य धरलं जाऊ शकतं. म्हणजे नंतर पैसे देण्यास मित्र किंवा नातेवाईकांनी नकार दिल्यास तुम्ही काहीही करु शकणार नाही. त्यामुळे अशावेळी लेखी करार करण्याचा प्रयत्न करा. शक्य असल्यास, स्टॅम्प पेपरवर तुमच्या दोघांमध्ये कायदेशीर करार करण्याचा प्रयत्न करा. हा व्यवहार एक दस्तऐवज बनवण्यासाठी आणि तुमच्या संबंधांचे रक्षण करण्यासाठी कर्जाची रक्कम, परतफेडीची मर्यादा, व्याज यांसारख्या तपशीलांचा उल्लेख करा. फुकटात पाहा सिनेमे, वेब सीरिज, टीव्ही शोज्; फक्त ‘हे’ अ‍ॅप्स डाऊनलोड करावे लागतील कर्ज देतांना रोखीने व्यवहार करण्याऐवजी नेहमी बँक ट्रान्सफर पर्यायाचा वापर करावा. तसंही 20 हजारांच्या पुढचं रोखीचा कर्ज व्यवहार तर मानलाच जात नाही. आयकर नियमानुसार 20,000 पेक्षा जास्त रक्कम रोखीने उधार देणे किंवा घेण्याची परवानगी नाही. तुम्ही याचे पालन न केल्यास आयकर विभाग तुमच्याकडून दंड देखील आकारू शकतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्यवहार 50 हजारांच्या वर असेल आणि त्याचा काही लीगल डॉक्युमेंट तयार केलं नसेल तर आयकर विभाग याला गिफ्ट समजून यावरही कर आकारला जाऊ शकतो. Home Loan: कोणत्या बँकेकडून मिळतंय सर्वात स्वस्त गृहकर्ज? चेक करा लिस्ट हप्त्यांमध्ये कर्जाची परतफेड करण्यासाठी तुम्ही तुमच्या मित्राला पोस्ट-डेटेड अकाऊंट पेयी चेक तुमच्या नावाने देण्यास सांगू शकता. जर त्याचा चेक निर्धारित तारखेला बाऊन्स झाला तर तुम्ही ताबडतोब कायदेशीर कारवाई करू शकता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या