JOIN US
मराठी बातम्या / मनी / Share Market : शेअर बाजारात पुढील आठवड्यात कोणते घटक महत्त्वाचे ठरतील? तज्ज्ञांना काय वाटतं?

Share Market : शेअर बाजारात पुढील आठवड्यात कोणते घटक महत्त्वाचे ठरतील? तज्ज्ञांना काय वाटतं?

रशिया-युक्रेन युद्ध, व्याजदरांबाबत अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेचा निर्णय आणि देशांतर्गत आघाडीवरील महागाईची आकडेवारी या आठवड्य़ात शेअर बाजारांची दिशा ठरवेल, असे विश्लेषकांचे मत आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 13 मार्च : भारतीय शेअर बाजार अनेक आठवड्यांनंतर गेल्या आठवड्यात रिकव्हरी मोडमध्ये आला आहे. सेन्सेक्स निफ्टी वाढीसह बंद झाला. या पार्श्वभूमीवर येणारा आठवडा अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. होळी निमित्त शुक्रवार, 18 मार्च रोजी बाजार बंद राहील, त्यामुळे या आठवड्यात केवळ चार दिवसच ट्रेडिंग असेल. रशिया-युक्रेन युद्ध, व्याजदरांबाबत अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेचा निर्णय आणि देशांतर्गत आघाडीवरील महागाईची आकडेवारी या आठवड्य़ात शेअर बाजारांची दिशा ठरवेल, असे विश्लेषकांचे मत आहे. बाजारातील अस्थिरतेचा कल सध्या तरी कायम राहणार असल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे. स्वस्तिका इन्व्हेस्टमार्टचे संशोधन प्रमुख संतोष मीना यांनी पीटीआयला सांगितले की, FOMC (फेडरल ओपन मार्केट कमिटी) बैठक, रशिया-युक्रेन संघर्ष या आठवड्यात बाजारासाठी एक महत्त्वपूर्ण जागतिक घटक असेल. रशिया-युक्रेन तणावाबाबत अजूनही अनिश्चितता आहे. महागाईची आकडेवारी 14 मार्चला येईल फेडरल ओपन मार्केट कमिटी (FOMC) च्या बैठकीचे निकाल 16 मार्च रोजी येतील. मीना म्हणाल्या की, या सगळ्यात कच्च्या तेलाच्या किमती आणि परदेशी गुंतवणूकदारांचा रस भारतीय बाजारांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा ठरेल. महागाईची आकडेवारी 14 मार्चला येईल. कमी ट्रेडिंग सत्रांचा आठवडा रेलिगेअर ब्रोकिंगचे रिसर्चचे उपाध्यक्ष अजित मिश्रा म्हणाले की, हा आठवडा कमी ट्रेडिंग सत्रांचा असेल. सोमवारी औद्योगिक उत्पादन (IIP) डेटावर बाजारातील सहभागी प्रतिक्रिया देतील. त्याचप्रमाणे ग्राहक किंमत निर्देशांक (Consumer Price Index) आणि घाऊक किंमत निर्देशांकावर (Wholesale price index) आधारित महागाईची आकडेवारीही येणार आहे. यूएस मध्यवर्ती बँकेच्या बैठकीचे निकाल 16 मार्च रोजी जाहीर होतील. सर्वांच्या नजरा त्यांच्यावर असतील. गेल्या आठवड्यात, मुंबई स्टॉक एक्सचेंज (BSE) च्या 30 शेअर्सचा सेन्सेक्स 1,216.49 अंकांनी किंवा 2.23 टक्क्यांनी वधारला. त्याच वेळी, नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) चा निफ्टी 385.10 अंकांनी किंवा 2.37 टक्क्यांनी वाढला. बाजारातील अस्थिरता कायम राहील मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेसचे रिटेल रिसर्चचे प्रमुख सिद्धार्थ खेमका म्हणाले की, विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले आहेत आणि आता बाजार नजीकच्या भविष्यात इतर महत्त्वाच्या घटकांवर प्रतिक्रिया देईल. रशिया-युक्रेनमधील भू-राजकीय तणाव, कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली वाढ, अर्थव्यवस्थेवरील महागाईच्या दबावावर रिझव्‍‌र्ह बँकेची प्रतिक्रिया आदींवर आता बाजाराची नजर असेल. हे अनुकूल होईपर्यंत बाजार अस्थिर राहील. सॅमको सिक्युरिटीजच्या इक्विटी रिसर्चच्या प्रमुख येशा शाह यांनी सांगितले की, रशिया-युक्रेन युद्ध आणि यूएस मध्यवर्ती बँकेची बैठक या आठवड्यातील बाजारासाठी महत्त्वाच्या घडामोडी आहेत. देशांतर्गत आघाडीवरील महागाईची आकडेवारीही बाजाराच्या दिशेसाठी महत्त्वाची ठरेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या