JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनी / लग्नसराईत करणार आहात Gold Investment? अजिबात विसरू नका या 6 बाबी, राहाल फायद्यात

लग्नसराईत करणार आहात Gold Investment? अजिबात विसरू नका या 6 बाबी, राहाल फायद्यात

Investment in Gold: सोन्याने कठीण काळात अनेकांना साथ दिली आहे, त्यामुळे फेस्टिव्ह सीझनमध्ये सोन्याची खरेदी वाढली होती. आता लग्नसराईचा काळ सुरू होणार असल्याने सोन्याची मागणी आणखी वाढू शकते

019

गेल्या अनेक दशकांपासून सोन्यातील गुंतवणुकीचा पर्याय (Gold Investment) हा सुरक्षित आणि सोपा मानला जातो. यामध्ये रिटर्न देखील चांगला मिळतो. संकटकाळात गुंतवणूक केलेल्या सोन्याची विशेष मदत झाल्याचं अनेकदा पाहायला मिळालं आहे. आकडेवारीच्या मते, सप्टेंबर 2019 ते सप्टेंबर 2021 पर्यंत गोल्ड लोनचा (Gold Loan) आकार सव्वा दोन पटींनी वाढला आहे.

जाहिरात
029

सोन्याने कठीण काळात अनेकांना साथ दिली आहे, त्यामुळे फेस्टिव्ह सीझनमध्ये सोन्याची खरेदी वाढली होती. आता लग्नसराईचा काळ सुरू होणार असल्याने सोन्याची मागणी आणखी वाढू शकते.

जाहिरात
039

प्रत्यक्ष सोन्याव्यतिरिक्त, ग्राहक सॉव्हरेन गोल्ड बाँड्स, गोल्ड ईटीएफ, डिजिटल गोल्ड आणि गोल्ड म्युच्युअल फंड यांसारख्या माध्यमांतूनही सोने खरेदी करू शकतात. तुम्हालाही सोने खरेदी करायचे असेल तर तुम्हाला या गोष्टी माहित असणे आवश्यक आहे.

जाहिरात
049

1. उच्च परतावा- आयआयएफएल सिक्युरिटीजचे व्हीपी अनुज गुप्ता म्हणाले की, गेल्या दोन वर्षांपासून नाराज असणारे ज्वेलर्स यावेळी आनंदी आहेत कारण यावेळी विक्रमी मागणी दिसून येत आहे. गुप्ता यांच्या मते, 2020 मध्ये सोन्याने 25 टक्के परतावा दिला आहे. पुढील वर्षी दिवाळीपर्यंत सोन्याचा भाव 55,000 ते 60,000 रुपये प्रति तोळावर पोहोचण्याचा अंदाज आहे. मागणीत वाढ, महागाई, कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, जागतिक विकासाचा कमी अंदाज, चीनचे कमी रेटिंग आणि भू-राजकीय तणाव यामुळे सोन्याच्या दरात वाढ होईल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

जाहिरात
059

2. चांदीच्या किंमतीतही तेजी- गुप्ता यांनी अशी माहिती दिली आहे की, चांदीची मागणी सोन्यापेक्षा जास्त आहे. त्यामुळे सोन्याच्या किंमतीत तेजी येऊ शकते. त्यामुळे तुम्ही यामध्येही गुंतवणूक करण्याचा विचार करू शकता.

जाहिरात
069

3. दोन-तीन फॉरमॅटमध्ये करा गुंतवणूक- गुप्ता यांनी अशी माहिती दिली आहे की, गुंतवणूकदारांनी सोन्यामध्ये गुंतवणूक करताना 2-3 प्रकारात गुंतवणूक करावी. ज्यांना भौतिक सोन्याच्या सुरक्षिततेबद्दल खात्री नाही ते डिजिटल गोल्ड आणि गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक करू शकतात.

जाहिरात
079

4. केवळ हॉलमार्क केलेले दागिने खरेदी करा-हॉलमार्क केलेले दागिने शुद्धतेची हमी देतात. त्यामुळे नेहमी हॉलमार्क केलेले दागिनेच खरेदी करा. ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) ही हॉलमार्क केलेले सोने प्रमाणित करणारी एजन्सी आहे.

जाहिरात
089

5. शुद्धता ओळखा- सोन्याची शुद्धता कॅरेटमध्ये ओळखली जाते. 24 कॅरेट सोने म्हणजे ते 99.9% शुद्ध आहे. हे 999 क्रमांकाद्वारे देखील दर्शविले जाते. त्याच वेळी, 22 कॅरेट सोने 92% शुद्ध आहे.

जाहिरात
099

6. मेकिंग चार्ज तपासा- सोन्याच्या दागिन्यांवर घडणावळीचे शुल्क (Making Charges) आकारले जाते. हे दागिन्यांच्या डिझाइनच्या प्रकारावर अवलंबून असते. तसेच, दागिने मशीनने बनवले आहेत की हाताने बनवले आहेत यावर मेकिंग चार्ज अवलंबून असतो. हाताने बनवलेल्या दागिन्यांपेक्षा मशीनने बनवलेले दागिने स्वस्त असतात. तसेच, अनेक ठिकाणी मेकिंग चार्जेसवर सूटही दिली जाते.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या