आजकालच्या भारतीय तरुण पिढीची बातच काही न्यारी आहे. त्यांची सर्जनशीलता व व्यक्तिमत्वच त्यांची जीवनशैली व राहण्याच्या ठिकाणाबाबत स्पष्टता देते. अशाच अनेक नावांपैकी दोन नावे म्हणजे मोहन बहिणी, शक्ती व मुक्ती. या ख्यातनाम डान्सर-सिस्टर जोडीने आपल्या चाहत्यांसाठी ‘Asian Paints व्हेअर द हार्ट इज’ सीझन 4 च्या अंतिम एपिसोडमध्ये दिल्लीमधील त्यांच्या प्रशस्त घराची सफर घडवली आणि कुटुंबामध्ये शाश्वत बंध टिकून राहण्यासाठी आणि वैयक्तिक कामगिरी उंचावण्यासाठी घर किती महत्त्वाचे आहे, हे दाखवून दिले. लहानपणापासून ते प्रसिद्धी मिळेपर्यंत, सिनेमा, डान्स रिॲलटी शोमधील त्यांचे अस्तित्व या सर्वांमागे शक्ती व मुक्तीचे चैतन्यमय घर हे सकारात्मक सहयोग आणि कामगिरीसाठी कारणीभूत आहे. दोन्ही बहिणींचे जे रेग्युलर फॉलोअर्स आहेत, त्यांना तर त्यांचे हिरवे टेरेस गार्डन माहितच असणार, जी त्यांची स्वतःच बनवलेली सादरीकरणाची व सराव करण्यासाठीची मनपसंत जागा आहे. पण उन्हाळ्यात जेव्हा टेरेस खूप तापते किंवा पावसाळ्यात खूप पाऊस असतो तेव्हा मात्र तळमजल्यावरील लिव्हिंग रुमचा वापर केला जातो. काही फर्निचरची जागा बदलली तर ती रुम एका डान्स स्टुडिओमध्ये रुपांतरीत होते. शक्ती व मुक्ती मोहनसाठी हे घर त्यांच्या व्यावसायिक कामगिरीसाठी जितके महत्त्वाचे आहे तितकेच त्यांच्या आठवणींनी देखील काठोकाठ भरलेले आहे. कुटुंबासोबत राहून या बहिणींनी घराचे घरपण अनुभवले आहे, तसेच याच ठिकाणी राहून अनेक सण-उत्सव मोठ्या थाटामाटात साजरे केले आहेत. शक्ती व मुक्ती या दोघींमधील ऋणानुबंध जपले गेले आहेत ते याच घरात, त्यांच्या वैयक्तिक व व्यावसायिक कामाची मुहूर्तमेढ रोवली गेली आहे ती याच घरात. या घरामुळेच तर त्यांची पावलेही सारखीच थिरकतात व त्यांच्या जीवनातील आवडीनिवडी देखील जुळून येतात. जेव्हा दोघींच्या बेडरुमला भेट द्याल तेव्हा मात्र त्यांच्या व्यक्तिमत्वातील फरक स्पष्ट होतो. दोन वर्षांनी मोठ्या असलेल्या शक्तीच्या रुममध्ये शांतता व प्रतिबिंब यांचा संगम पाहायला मिळतो तर मुक्तीच्या रुममध्ये जीवंतता व ऊर्जेचा भास होतो, जी ती नेहमी जगाला दाखवून देत असते. दोन्ही बहिणींनी त्यांच्या रुम्स ॲक्सेसरीज व सजावटीच्या वस्तूंनी सुशोभित केल्या आहेत, जे पाहिल्यावर त्यांचे व्यक्तिमत्व व प्राधान्याची प्रकर्षाने जाणीव होते. मोहन भगिणींच्या घरगुती आनंदाचे स्वतःचे व्हर्जन पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
सेलिब्रिटींच्या घरातील जिव्हाळ्याचे क्षण हे ‘Asian Paints व्हेअर द हार्ट इज सीझन 4’ चे वैशिष्ट्य आहे. या सीरिज दरम्यान, प्रेक्षकांना शंकर महादेवन, तमन्ना भाटिया, अनिता डोंगरे, स्मृती मंधाना, प्रतीक कुहड आणि राजकुमार राव यांच्या घरात प्रवेश करता आला. या महान कलाकारांनी रसिकांसाठी त्यांच्या घराचे व हृद्याचे दरवाजे उघडे केले होते. प्रसिद्ध व्यक्तींच्या घराच्या या आश्चर्यकारक, वैयक्तिक लुकने मागील तीन सीझनचा विचार करता ‘Asian Paints व्हेअर द हार्ट इज’ ला जवळपास 250 दशलक्ष पेक्षा अधिक व्ह्यूज मिळवून दिले आहेत. आणि मंडळी, सीझन 4 ने अपेक्षा अधिकच उंचावल्या आहेत!