Personal Loan की Auto Loan यामधील फरक समजून घ्या
मुंबई, 27 फेब्रुवारी : आजच्या काळात वैयक्तिक कर्ज (Personal Loan) घेण्याची प्रक्रिया खूप सोपी आहे. यासाठी तुम्ही घरी बसूनही अर्ज करू शकता किंवा बँकेत जाऊन काही किरकोळ कागदपत्रे (Documents) भरूनही तुम्ही वैयक्तिक कर्जासाठी अर्ज करू शकता. BankBazaar नुसार, तुम्हाला कर्जावर दर महिन्याला काही व्याज द्यावे लागेल, जे काही वेळा आर्थिकदृष्ट्या त्रासदायक ठरू शकते. अशा परिस्थितीत, लोक आऊटस्टँडिंग भरून लोन फोरक्लोज करण्याचा विचार करतात. तुमच्या क्रेडिट स्कोअरसाठी (Credit Score) कर्जाचे किती प्रीपेमेंट किंवा पार्शियल पेमेंट योग्य आहे याबद्दल माहिती घेऊ. वैयक्तिक कर्ज 3 प्रकारे बंद केले जाऊ शकते. रेग्युलर क्लोजर यामध्ये ग्राहक निश्चित वेळेपर्यंत दर महिन्याला त्याचा ईएमआय भरतो. EMI पूर्ण झाल्यानंतर, शेवटचा हप्ता पूर्ण होताच कर्ज बंद करण्यासाठी बँकेशी संपर्क साधावा. यासाठी तुम्हाला हवे असल्यास तुम्ही कस्टमर केअरशीही बोलू शकता. Finance Tips : तुमच्या पैशाचं असं करा नियोजन? आर्थिक संकटात अडकणार नाही प्री क्लोजर जेव्हा एखाद्या ग्राहकाला कर्जाची मुदत संपण्यापूर्वी कर्जाची पूर्ण रक्कम भरायची असते, तेव्हा त्याला प्रीक्लोजर म्हणतात. सर्व बँकांचे लॉकइन कालावधी वेगवेगळे असतात, त्यापूर्वी कर्ज बंद केले जाऊ शकते. काही बँका प्रीक्लोजर चार्ज करतात तर काही बँका त्यासाठी शुल्क आकारत नाहीत. Share Market: पुढील आठवड्यात शेअर बाजाराची चाल कशी असेल? काय आहे तज्ज्ञांचं म्हणणं? प्रीक्लोजरचा काय परिणाम होऊ शकतो? अनेक बँका तुम्हाला वैयक्तिक कर्जाच्या प्रीपेमेंटची सुविधा देतात. तुम्ही कर्जाची प्रीपेमेंट केल्यास, तुमचा बराच वेळ आणि पैसा वाचू शकतो. काही बँका 2 टक्के ते 5 टक्क्यांपर्यंत प्रीक्लोजरवर दंड देखील आकारतात. प्रीपेमेंटसाठी तुम्हाला किती नफा किंवा तोटा झाला आहे याची माहिती घ्यायची असेल तर तुम्ही ऑनलाइन ईएमआय कॅल्क्युलेटर वापरू शकता. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकांना वैयक्तिक कर्जाच्या प्रीपेमेंटसाठी दंड आकारू नये असे सांगितले आहे. परंतु ते फक्त फ्लोटिंग रेट कर्जासाठी लागू आहे. तुम्हाला भविष्यात प्रीपेमेंट करायचे असेल, तर बँकेच्या फोरक्लोजरबाबतचे नियम नक्की वाचा. अशा परिस्थितीत जर तुमचा क्रेडिट स्कोर चांगला असेल तर तुम्ही हा पर्याय निवडू शकता. पूर्ण प्रीपेमेंट तुमचा क्रेडिट स्कोअर वाढवू शकतो.