वेणूगोपाल धूत यांना अटक
मुंबई : आताची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. कोचर दाम्पत्यानंतर आता वेणूगोपाल धूत यांना अटक करण्यात आली आहे. चंदा कोचर आणि त्यांचे पती यांना CBI ने कारवाई केली होती. त्यानंतर व्हिडीओकॉनचे चेअरमन वेणूगोपाल धूत यांना अटक केली आहे. 2009 आणि 2011 मध्ये नियम धाब्यावर बसवून व्हिडीओकॉनला कर्ज देण्यात आलं होतं. या प्रकरणी CBI ने कोचर दाम्पत्यापाठोपाठ आता वेणूगोपाल धूत यांच्यावर कारवाईचा बडगा उचलला आहे. वेणूगोपाल धूत यांना आज न्यायालयात हजर केलं जाणार आहे. नेमकं काय आहे प्रकरण? सीबीआयच्या म्हणण्यानुसार, 2009 ते 2011 रोजी ICICI बँकेने व्हिडिओकॉन कंपनीला नियम धाब्यावर बसवून 6 उच्च मूल्याची कर्जे दिली होती. हे कर्ज देणाऱ्या समितीमध्ये चंदा कोचर यांचाही समावेश होता. यापूर्वी ईडीने 3000 कोटींच्या कर्ज घोटाळ्याप्रकरणी त्यांच्यावर मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला होता. चंदा कोचर यांनी कर्ज वाटपात अनियमितता केल्याचा सीबीआयचा आरोप आहे. कर्जाच्या बदल्यात त्यांनी व्हिडिओकॉनच्या प्रवर्तकांकडून मोठी रक्कम घेतली होती. CNBC आवाजने दिलेल्या माहितीनुसार CBI ने 2019 मध्ये वेणूगोपाल धूत यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. शुक्रवारी संध्याकाळी कोचर दाम्पत्याला अटक केल्यानंतर सोमवारी सकाळी वेणूगोपाल यांना अटक करण्यात आली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वेणूगोपाल धूत यांनी या प्रकरणात सरकारी पक्षाचा साक्षीदार होण्याची तयारी दर्शवली आहे. एकदा आरोपपत्र दाखल झाले आणि आरोप निश्चित झाले की, तपास यंत्रणा कोर्टाला सांगू शकते की आरोपीने सरकारी साक्षीदार होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. एकदा का न्यायालयाला खात्री पटली की आरोपीला सरकारी पक्षाचा साक्षीदार बनण्याची परवानगी दिली गेली, की त्याचा उपयोग होऊ शकतो, न्यायालय परवानगी देते.या टप्प्यावर एखादा आरोपी फिर्यादी साक्षीदार होण्याची ऑफर देऊ शकतो आणि कोठडीतील चौकशीदरम्यान काही सूट देखील मागितली जाऊ शकते अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. #Breaking | Videocon owner Venugopal Dhoot arrested by CBI in ICICI fraud case @siddhantvm and @Ashish_Mehrishi with details Join the broadcast with @ToyaSingh | #ICICI #Videocon pic.twitter.com/eOAAbJCAAe — News18 (@CNNnews18) December 26, 2022
या कर्जाच्या बदल्यात व्हिडिओकॉनच्या प्रवर्तकांनी चंदा कोचर यांच्या पतीला कोट्यवधी रुपये दिल्याचा सीबीआयचा आरोप आहे. या सगळ्या आरोपांनंतर चंदा कोचर यांना 2018 मध्ये आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला.