मुंबई, 17 जून : टॅक्स न भरणाऱ्यांबाबत इन्कम टॅक्स डिपार्टमेंटनं कडक पावलं उचललीयत. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या रिवाइज्ड गाइडलाइन्सप्रमाणे काळा पैसा आणि बेनामी कायद्याअंतर्गत केलेले अपराध गंभीर मानले जातील. आतापर्यंत त्यांना कडक शिक्षा नव्हत्या. म्हणजे अगोदर कुणी कर बुडवला तर त्याला टॅक्स पेमेंट, पेनल्टी, दंड या गोष्टी कराव्या लागायच्या. आता इन्कम टॅक्सची नवी गाइडलाइन लागू झालीय. आता टॅक्स न भरण्याचा गुन्हा गंभीर मानला जाईल. 13 प्रकारच्या टॅक्स गुन्ह्यांची लिस्टिंग झाली रिव्हाइज्ड गाइडलाइन्समध्ये 13 गोष्टींचं लिस्टिंग झालं. सेंट्रल बोर्ड आॅफ डायरेक्टर टॅक्स ( CBDT )नं आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना या आधारावरच टॅक्स बुडवणाऱ्यांवर कारवाई करायला सांगितली आहे. हे 13 मामले आतापर्यंत गंभीर अपराध या श्रेणीत येत नव्हते. लॉ प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर, पाहा info.mahacet.org या वेबसाईटवर टॅक्स न भरणं कुठल्या गुन्ह्यांत येतं ते पाहा मिंटच्या माहितीनुसार इन्कम टॅक्सच्या कलम 115-0 किंवा XVII-Bच्या अंतर्गत तुम्ही कर भरत नसाल तर तुम्ही A कॅटेगरीच्य गुन्ह्यात येता. टॅक्स कलेक्टर म्हणून कुठली कंपनी किंवा व्यक्ती कर भरत नसेल तर ती या कॅटेगिरीत गुन्हेगार म्हणून मानली जाते. सरकारी बँकांना 30 हजार कोटी मिळावेत म्हणून मोदी सरकारचा ‘हा’ प्लॅन विलफुल डिफाॅल्ट कुठल्या कॅटेगिरीत? ज्या कंपनी आणि व्यक्ती कर चोरीत विलफुल डिफाॅल्ट करतात, त्या कॅटेगिरी B मध्ये येतात. यात जे लोक आवश्यक कागदपत्रं आणि खात्यांची माहिती देत नाहीत, तेही येतात. व्हेरिफिकेशनसाठी खोटी कागदपत्रं देणारे या गुन्हाच्या अंतर्गत येतात. ‘या’ बँकेत खातं उघडलंत तर मिळतील 3 डेबिट कार्डस् आणि बऱ्याच सुविधा नव्या गाइडलाइन्सप्रमाणे इन्कम टॅक्सचं कलम 275 A, 275B आणि 276 अऩुसार केलेल्या गुन्ह्यांना गंभीर श्रेणीत घातलं नव्हतं. नव्या गाइडलाइन्सनी 2014च्या गाइडलाइन्सची जागा घेतली. आता सुधारित गाइडलाइन्सप्रमाणे ब्लॅकमनी अँड इम्पोजिशन आॅफ टॅक्स अॅक्ट 2015 नुसार केलेल्या गुन्ह्यांना गंभीर समजलं जाईल. प्रोहिबिटेशन अॅक्ट 1988प्रमाणे केलेल्या गुन्ह्यांनाही टॅक्स अधिकारी गंभीर समजला जाईल. VIDEO : कार्यकर्ते भडकले, भरसभेत नेत्यांना कपडे फाटेपर्यंत धुतले