JOIN US
मराठी बातम्या / मनी / मोदी सरकारच्या 'या' योजनेत मिळेल जास्त पेन्शन, होऊ शकतो निर्णय

मोदी सरकारच्या 'या' योजनेत मिळेल जास्त पेन्शन, होऊ शकतो निर्णय

Union Budget 2019, Atal Pension Yojana - 60 वर्षांवरील व्यक्तींना मिळणाऱ्या पेन्शनमध्ये वाढ होऊ शकते

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 26 जून : पेंशनर्ससाठी एक चांगली बातमी आहे. मोदी सरकार अटल पेन्शन योजनेतली (APY ) रक्कम वाढवण्याचा विचार करतंय. पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथाॅरिटी ( PFRDA )नं पेन्शनची रक्कम आणि वय वाढवण्याचा प्रस्ताव सरकारसमोर ठेवलाय. सरकार यावर विचार करतंय. अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी संसदेला लिहिलंय की सरकार अटल पेन्शन योजनेत  ( APY ) वाढ करण्याचा विचार करतंय. या योजनेअंतर्गत सरकार 60 वर्षांवरच्या व्यक्तींना 1000 रुपये, 2000 रुपये, 3000 रुपये, 4000 रुपये आणि 5000 रुपये दर महिन्याला पेन्शन देते. जितका प्रीमियम त्याप्रमाणे पेन्शन मिळतं. अटल पेन्शन योजनेत तुम्ही कमीत कमी 20 वर्ष गुंतवणूक करू शकता. 18 ते 40 वर्षापर्यंत लोक त्यात भाग घेऊ शकतात. व्यक्तीचा मृत्यू झाला तर पुढे त्याचा जोडीदार ही योजना सुरू ठेवू शकतो. मुंबई विद्यापीठात 67 जागांवर भरती, ‘या’ पदांसाठी मागवलेत अर्ज तुम्हाला दर महिन्याला 1 हजार रुपयांचं पेन्शन हवं असेल तर वयाप्रमाणे 42 रुपयांपासून 291 रुपयांपर्यंत दर महिन्याला गुंतवावे लागतील. समजा गुंतवणूकदाराचा मृत्यू झाला तर नाॅमिनीला 1,70,000 रुपये मिळतील. सोन खरेदी महागणार, अमेरिका-इराणमधल्या ट्रेड वॉरचा फटका तुम्हाला दर महिन्याला 2 हजार रुपयांचं पेन्शन हवं असेल तर दर महिन्याला 84 रुपये ते 582 रुपये भरावे लागतील. या योजने दरम्यान व्यक्ती आणि त्याच्या पत्नीचा मृत्यू झाला तर नाॅमिनीला 3,40,000 रुपये मिळतील. आता गोदरेज घराण्यामध्ये प्रॉपर्टीवरून वाद, हे मुंबई आहे कनेक्शन दर महिना 5 हजार रुपये पेन्शन हवं असेल तर दर महिन्याला 210 रुपयांपासून ते 1454 रुपयांपर्यंत पैसे भरावे लागतील. आणि योजनेदरम्यान मृत्यू झाला तर नाॅमिनीला 8,50,000 रुपये मिळतील. ही स्कीम समाजातल्या कमकुवत वर्गासाठी आहे. यात गुंतवणूक करण्यासाठी तुमचं बँकेत बचत खातं आणि आधार कार्ड असायला हवं. यात 6 महिने पैसे भरले नाहीत तर खातं फ्रीज करतील. 12 महिन्यात भरले नाहीत तर ते डिअॅक्टिव्ह करतील आणि 24 महिन्यांनी बंद करतील. त्यामुळे त्यात नियमित पैसे भरले पाहिजेत. मान्सून आला पण पाऊस बेपत्ता, दुबार पेरणीचं संकट

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या