JOIN US
मराठी बातम्या / मनी / जगभरात LPG ची सर्वांत जास्त किंमत भारतात, काय आहेत त्यामागची कारणं समजून घ्या

जगभरात LPG ची सर्वांत जास्त किंमत भारतात, काय आहेत त्यामागची कारणं समजून घ्या

भारतात गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेल (Petrol Diesel rates) आणि गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरात रोज वाढ होत असून गॅस सिलिंडर काही दिवसांपूर्वी तब्बल 250 रुपयांनी महागला होता.

जाहिरात

LPG-CNG च्या किंमती 1 सप्टेंबरपासून बदलणार, दर वाढणार की कमी होणार कसं ठरतं? वाचा सविस्तर

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 09 एप्रिल: भारतात गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेल (Petrol Diesel rates) आणि गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरात रोज वाढ होत असून गॅस सिलिंडर काही दिवसांपूर्वी तब्बल 250 रुपयांनी महागला होता. दरम्यान, या दरवाढीनंतर भारत हा जगातला सर्वांत महाग LPG असणारा देश बनला आहे. जगभरात LPGची सर्वांत जास्त किंमत भारतात असण्यामागची कारणं काय आहेत, हे समजून घेऊ या. ‘आज तक’ने या संदर्भातलं वृत्त दिलं आहे. जगात सर्वांत महाग एलपीजी भारतात का आहे, याचं उत्तर चलनांच्या क्रयशक्तीनुसार मोजले तर मिळेल; पण त्यासाठी आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेशी (International Market) संबंधित अनेक गोष्टी समजून घ्याव्या लागतील. या गणितानुसार, भारतातली पेट्रोलची प्रति लिटर किंमत जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे, तर डिझेलच्या किंमतीच्या बाबतीत आपण जगात 8 व्या क्रमांकावर आहोत. IPL 2022, MI vs RCB  Dream11 Team Prediction : ‘हे’ 11 खेळाडू तुमच्यासाठी ठरणार निर्णायक सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास आपल्या देशात आपण एका रुपयात जेवढं सामान खरेदी करू शकतो, त्यापेक्षा जास्त वस्तू आपण नेपाळमध्ये खरेदी करू शकतो. तेवढ्याच पैशांत अमेरिकेत मात्र आपल्याला काहीही मिळणार नाही. म्हणजेच प्रत्येक चलनाने आपल्या देशांतर्गत बाजारात किती आणि कोणती वस्तू खरेदी करता येईल, ही त्याची क्रयशक्ती असते. वेगवेगळ्या देशांच्या चलनाची क्रयशक्ती वेगवेगळी असते; पण चलनाची क्रयशक्ती आंतरराष्ट्रीय बाजारात (International Market) गेल्यावर बदलते. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत जगभरातल्या चलनांमध्ये होणारा कोणताही व्यापार नाममात्र विनिमय दराने केला जातो. त्यानुसार देशाच्या चलनाची क्रयशक्ती ठरवली जाते. प्रत्येक देशातल्या नागरिकांच्या उत्पन्नात बरीच तफावत असते. सरासरी भारतीयांसाठी, भारतात एक लिटर पेट्रोल खरेदी करणं हा त्यांच्या दैनंदिन उत्पन्नाच्या एक चतुर्थांश खर्च असू शकतो, तर अमेरिकन व्यक्तींसाठी त्यांच्या दैनंदिन उत्पन्नाचा फक्त एक भाग असू शकतो. पर्चेसिंग पॉवर पॅरिटी या सूत्रानुसार, जेव्हा गणित कराल तेव्हा तुमच्या लक्षात येईल, की आपण भारतीय जगातला सर्वांत महाग एलपीजी खरेदी करतो. कारण त्यासाठी आपण आंतरराष्ट्रीय डॉलरमध्ये 3.5 डॉलर इतकी किंमत देत आहोत. सरासरी भारतीय पेट्रोलसाठी 5.2 डॉलर आणि डिझेलसाठी 4.6 डॉलर मोजत आहे. Corona लसीच्या Booster Doseसाठी रजिस्ट्रेशनची गरज नाही, मग कसा मिळेल डोस; वाचा सविस्तर एखाद्या देशाच्या नागरिकाची क्रयशक्ती दुसऱ्या देशात किती असते, हे पर्चेसिंग पॉवर पॅरिटीच्या (Purchasing Power Parity) सूत्रावरून कळतं. उदाहरणार्थ, तुम्ही भारतात 100 रुपयांत जसं आयुष्य जगू शकता, तेच आयुष्य तुम्हाला अमेरिकेत जगण्यासाठी 4.55 डॉलर्स म्हणजेच सुमारे 345 रुपये लागतील. याचाच अर्थ पर्चेसिंग पॉवर पॅरिटीच्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय बाजारात 1 डॉलरचं मूल्य हे 75.84 रुपयांऐवजी केवळ 22 रुपये आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या