RBI
मुंबई, 4 मे : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तीकांत दास (RBI Governor Shaktikanta Das) यांनी रेपो दर (Repo Rate) आणि CRR (Cash Resrve Ratio) मध्ये वाढ करण्याची घोषणा करून एकप्रकारे धक्का दिला आहे. आरबीआयने रेपो दर 40 बेसिस पॉइंट्सने वाढवून 4.40 टक्के करण्याचा निर्णय घेतला आहे, तर सीआरआर 50 बेसिस पॉइंट्सने 4 टक्क्यांवरून 4.50 टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. रेपो दरवाढीचा काय परिणाम होईल? रेपो रेट हा दर आहे ज्यावर RBI बँकांना कर्ज देते. म्हणजेच RBI कडून कर्ज घेतल्यावर बँकांना आता 4 टक्क्यांऐवजी 4.40 टक्के व्याज द्यावे लागणार आहे. जेव्हा बँकांना जास्त व्याज द्यावे लागते, तेव्हा त्या ग्राहकांकडून कर्जावर जास्त घेणार. म्हणजेच रेपो रेट वाढवल्याचा परिणाम असा होणार आहे की, येत्या काळात सरकारपासून ते देशातील खासगी बँकांपर्यंत, गृहकर्जापासून ते कार कर्जापर्यंत, वैयक्तिक कर्ज, शैक्षणिक कर्जे आणि इतर सर्वच कर्ज महाग होतील. त्यामुळे तुम्ही ज्या जुन्या कर्जावर चालत आहात त्याचा EMI देखील वाढेल. महागाई नियंत्रित करण्यासाठी रेपो दरवाढीचा निर्णय घेतल्याचे आरबीआयने सांगितले आहे. रिझर्व्ह बँकेचा सर्वसामान्यांना झटका, रेपो रेटमध्ये वाढ; होम, ऑटो लोनसह सर्वच कर्ज महागणार CRR वाढीचा काय परिणाम होईल? सतत वाढणारी महागाई सर्वसामान्यांना डोकेदुखी ठरत आहे. बाजारात उपलब्ध असलेली जास्त रोकड हे महागाईचे प्रमुख कारण असल्याचे मानले जात आहे. यामुळेच बँकांकडे असलेली अतिरिक्त रोकड कमी करण्यासाठी आरबीआयने सीआरआरमध्ये 50 बेसिक पॉईंट्सची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. बँकांना एकूण ठेवींपैकी 4.50 टक्के रक्कम आरबीआयकडे CRR म्हणून जमा करावी लागेल. म्हणजेच बँकिंग व्यवस्थेतील सध्याची अतिरिक्त रोकड कमी होईल. त्यामुळे बँका आता नीट विचार करून कर्ज देणार आहेत. बँकांना आरबीआयकडे ठेवाव्या लागणार्या सीआरआरवर आरबीआय बँकांना व्याजही देत नाही. CRR मधील वाढ 21 मे पासून लागू होणार आहे. Free LPG Gas Cylinder: Paytm वर असा फ्री मिळेल गॅस सिलेंडर, पाहा बुक करण्याची सोपी प्रोसेस शेअर बाजारात मोठी घसरण? रिझव्र्ह बँकेने व्याजदरात वाढ केल्याची घोषणा केल्यानंतर शेअर बाजारामध्ये घसरण झाली. दुपारपर्यंत शेअर बाजार अर्ध्या टक्क्य़ांच्या घसरणीसह व्यवहार करत होता. दुपारी 2 वाजता रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी पत्रकार परिषद घेऊन रेपो दरात वाढ झाल्याची माहिती दिली. यानंतर भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण झाली. सेन्सेक्स 1306.96 अंकांनी घसरून 55669.03 वर बंद झाला. त्याच वेळी, निफ्टी 391.50 अंकांनी किंवा 2.29 टक्क्यांनी घसरून 16677.60 वर बंद झाला. निफ्टी बँक 899.20 अंकांनी घसरून 35264.55 वर बंद झाला.