ट्विटर
मुंबई : एलन मस्क यांच्या हातात सूत्र आल्यानंतर ट्विटरमध्ये बरेच बदल करण्यात आले आहेत. ट्विटरच्या ब्लू टिकसाठी 699 रुपये भरावे लागणार आहेत. एवढं नाही तर आता ट्विटरमध्येही अनेक बदल केले जात आहेत. एलोन मस्कने अनेकदा आपल्या निर्णयांनी लोकांना आश्चर्यचकित केले आहे. अलीकडेच इलॉन मस्क यांनी ट्विट करून काही नवीन निर्बंध जाहीर केले आहेत. त्यांनी ट्विट केले की, आता नॉन व्हेरिफाईड अकाउंट्स एका दिवसात फक्त 600 ट्विट वाचू शकतील. जरी या मर्यादा तात्पुरत्या स्वरूपात लागू केल्या गेल्या आहेत.
Insta आणि फेसबुकची मोठी घोषणा, युजर्सना द्यावे लागणार 699 रुपयेएलोन मस्क यांनी ट्विट केले की, ‘डेटा स्क्रॅपिंग आणि सिस्टम मॅनिपुलेशनच्या प्रकरणांना संबोधित करण्यासाठी आम्ही काही तात्पुरत्या मर्यादा लागू केल्या आहेत.‘नव्या नियमानुसार, ट्विटर ब्लू घेणारे युजर्स म्हणजेच ट्विटरवरील ब्लू टिक व्हेरिफाईड खातं असणारे युजर्स 6000 पोस्ट वाचू शकणार आहेत.
ट्विटरचं व्हॉटसएपच्या पावलावर पाऊल, सुरू करणार ही सुविधायाशिवाय ज्यांनी व्हेरिफाइड खातं घेतलं नाही ते फक्त 800 पोस्ट वाचू शकणार आहेत. ज्या नवीन ट्विटर अकाऊंटचं लॉगइन झालं नाही ते एका दिवसात फक्त 300 ट्विट पाहू शकणार आहेत. जुने ट्विट रिट्विट करत एलोन मस्क यांनी सांगितले की, व्हेरिफाइड खातं असलेले युजर आठ हजार, ज्यांचं खातं व्हेरिफाइड नाही ते 800 ट्विट वाचू शकतील. त्यांनी सांगितले की नवीन असत्यापित वापरकर्ते लवकरच 300 ऐवजी 400 ट्विट वाचू शकतील. ट्विटरसाठी आता लॉगइन करणं बंधनकारक आहे. जर लॉगइन केलं नाही तर जास्त काळासाठी ट्विटर वापरता येणार नाही. मस्कचे हे ट्विट अनेक वापरकर्त्यांच्या ट्विटर आउटेजच्या तक्रारींदरम्यान आले आहे. एलॉन मस्क यांनी ट्विटर सेवांमध्ये कोणतीही समस्या किंवा त्रुटी असल्याचे नाकारले. त्यांनी लिहिले की, ही चूक नाही, तर आम्ही जाणीवपूर्वक मर्यादा ठरवली आहे. त्यांनी लिहिले की ट्विटर जाणूनबुजून API कॉल मर्यादित करत आहे.