टोमॅटोच्या किंमती वाढल्या
मुंबई : नॉनव्हेज असो किंवा व्हेज भाज्यांमध्ये किंवा आमटीमध्ये सर्रास वापरला जातो तो टोमॅटो. थोडासा आंबटपणा आणि जेवणाची चव वाढवण्यासाठी टोमॅटो वापरला जातो. बाजारात आता 20 रुपयांना मिळणारा टोमॅटो तुम्हाला 60 रुपयांना मिळणार आहे. टोमॅटोचे दर वाढल्याने खिशाला कात्री लागणार आहे. वाशीतील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये टोमॅटो १८ ते २८ रुपयांना मिळत होते. मात्र गुरुवारी हेच घाऊक बाजारातील दर ४० रुपयांपर्यंत वधारले आहेत. तर दुसरीकडे किरकोळ बाजारात टोमॅटोचे दर ६० रुपयांवर पोहोचल्याने गृहिणींचं बजेट कोलमडलं आहे. सॅलडपासून ते जेवणात अगदी काही ठिकाणी नाश्त्यासाठी देखील टोमॅटोचा वापर केला जातो.
टोमॅटो, बटाट्यांसह भाजीपाला महागण्यामागे ‘ही’ आहेत कारणंवाशीतील एपीएमसी बाजारात टोमॅटो कमी प्रमाणात आले मात्र मागणी वाढली आहे. त्यामुळे ही दरवाढ आली आहे. टोमॅटोची चढ्या दराने विक्री केली जात आहे. उष्णता आणि अवकाळी पाऊस यामुळे टोमॅटोचं मोठं नुकसान झालं आहे. परराज्यातून आणि महाराष्ट्रातून टोमॅटोची आवक कमी झाल्याने भाव वाढल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलं आहे.
Vegetables For Monsoon : पावसाळ्यात नक्की खा या निवडक भाज्या, आजार राहतील दूरबाजारात सध्या राज्यातील टोमॅटो दाखल होत असून बंगळुरूवरुन होणारी आवक ही पूर्णतः बंद आहे. त्याठिकाणी ही मालाचे दर वधारले असल्याने बाजारात टोमॅटो दाखल होत नाही. आधी बाजारात टोमॅटोच्या ४०-५०गाड्या दाखल होत होत्या, मात्र आता उत्पादन कमी झाले आहे.
एपीएमसीत ५०%आवक असून टोमॅटोच्या २०-२५ गाड्या दाखल होत आहेत. मध्यंतरीच्या कालावधीत टोमॅटोला कवडी मोल बाजारभाव मिळत होता, त्यामुळे शेतकऱ्यांनी टोमॅटो उत्पादनाकडे अधिक लक्ष न दिल्याने उत्पादन कमी असल्याचं सांगितलं जात आहे.