JOIN US
मराठी बातम्या / मनी / Toll Receipts : नॅशनल हायवेची टोल पावती ठेवा सांभाळून, फ्रीमध्ये मिळतील 'या' सुविधा!

Toll Receipts : नॅशनल हायवेची टोल पावती ठेवा सांभाळून, फ्रीमध्ये मिळतील 'या' सुविधा!

Toll Receipts : महामार्गावरून जाताना अनेकदा टोल भरावा लागतो. ज्याच्या बदल्यात तुम्हाला पावती दिली जाते. या पावतीच्या मदतीने तुम्ही प्रवास तर करू शकताच पण या पावत्यांचे अनेक फायदेही आहेत.

जाहिरात

टोल पावती फायदे

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 11 जून : आज आपण टोल पावत्यांचे फायदे जाणून घेणार आहोत. मग तुम्ही या पावत्या पुढच्या वेळीपासून नक्कीच सांभाळून ठेवाल. बरेचदा तुम्ही तुमच्या वाहनाने हायवेवरुन चालत असता. तेव्हा टोल बूथवर तुम्हाला प्रवास सुरू ठेवण्यासाठी ठराविक रकमेच्या बदल्यात पावत्या दिल्या जातात. यासह तुम्ही प्रवास करु शकता. यासोबतच या पावत्यांचे अनेक फायदेही आहेत. त्यामुळे या पावत्या जपून ठेवा. निदान तुमचा प्रवास चालू असेपर्यंत तरी या पावत्या सांभाळून ठेवायला हव्यात. तुमच्या पावत्या हरवल्या असतील तर तुम्ही या लाभांपासून वंचित राहाल. कारण या टोलनाक्यांवर पैसे भरून जी पावती मिळते त्याचे अनेक फायदे आहेत.

फ्रीमध्ये मिळतील या सुविधा

नॅशनल हायवे टोलबूथवर पैसे भरल्यानंतर तुम्हाला जी पावती मिळते, त्या पावतीच्या पुढच्या किंवा मागच्या बाजूला एक ते चार फोन नंबर दिसतील. हे फोन नंबर हेल्पलाइन, क्रेन सेवा, रुग्णवाहिका सेवा आणि पेट्रोल सेवेचे आहेत. प्रवासादरम्यान टोल फी घेण्याच्या बदल्यात भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण देखील तुम्हाला या सर्व सेवा प्रदान करते. तुम्हाला हे चार क्रमांक भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या http://tis.nhai.gov.in/TollInformation?TollPlazaID=200 या साइटवर देखील मिळतील.

Railway Knowledge: रेल्वे ट्रॅकच्या कडेला का लावले जातात अॅल्युमिनियम बॉक्स? यात काय असतं?

लगेच मिळतो रिस्पॉन्स

चांगली गोष्ट म्हणजे हे सर्व हेल्पलाइन क्रमांक लगेच उचलले जातात. तात्काळ मदत दिली जाते. वाटेत तुम्हाला कोणत्याही प्रकारची समस्या असल्यास, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या हेल्पलाइन क्रमांक 1033. किंवा 108 वर कॉल करा. लगेच मदत मिळेल. ही सेवा चोवीस तास अखंड सुरू असते.

मेडिकल इमर्जन्सी नंबर

नॅशनल हायवेवर प्रवासादरम्यान अनेकदा मेडिकल इमर्जन्सी निर्माण होते. म्हणजे तुम्ही किंवा तुमच्यासोबत प्रवास करणारे लोक आजारी पडू शकतात. अशा वेळी पावतीच्या पुढे किंवा दुसर्‍या बाजूला दिलेल्या मेडिकल इमर्जन्सी फोन नंबरवर कॉल करा. तुमच्या कॉलच्या 10 मिनिटांच्या आत एम्बुलेन्स पोहोचली पाहिजे. एम्बुलेन्स प्रदान करणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा हेल्पलाइन क्रमांक 8577051000 आणि 7237999911 आहे. ही सुविधा पूर्णपणे मोफत आहे. यावर फोन केल्याने एम्बुलेन्स तातडीने घटनास्थळी पोहोचते.

CUR: क्रेडिट यूटिलायझेशन रेश्यो म्हणजे काय? याचा तुमच्या क्रेडिट स्कोअरवर कसा होतो परिणाम?

संबंधित बातम्या

पेट्रोल हेल्पलाइन नंबर

अचानक काही कारणाने तुमच्या गाडीचं इंधन संपलं तर टेन्शन नाही. तुम्ही गाडी रस्त्याच्या कडेला पार्क करा. पावतीवर दिलेल्या हेल्पलाइन नंबरवर किंवा पेट्रोल नंबरवर कॉल करा. तुम्हाला लवकरात लवकर 5 किंवा 10 लिटर पेट्रोल किंवा डिझेलचा पुरवठा केला जाईल. पण हो या इंधनाचे पैसे तुम्हाला द्यावे लागतील. पेट्रोल हेल्पलाइन क्रमांक 8577051000, 7237999944 आहे.

क्रेन हेल्पलाइन नंबर

प्रवासादरम्यान गाडी किंवा वाहनात काही बिघाड झाल्यास. ती चालतच नसेल तर राष्ट्रीय महामार्गाची एक हेल्पलाइन तातडीने मदत करेल. ते मेकॅनिकसह तुमच्यापर्यंत पोहोचेल. मेकॅनिक आणण्याची सुविधा मोफत आहे पण तुमच्या कार किंवा वाहनातील बिघाडासाठी मेकॅनिक नक्कीच चार्ज घेईल. तेथेही समस्या सोडवता आली नाही तर क्रेनने वाहन उचलून जवळच्या सर्व्हिस सेंटरमध्ये नेले जाईल. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा हा हेल्पलाइन क्रमांक 8577051000, 7237999955 आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या