मुंबई: सणासुदीच्या काळात बाहेर फिरणं किंवा घरात सामान आणण्यासाठी बाहेर जाणं होतं. त्यामुळे गाडीचा वापर खूप होतो. आता तुम्ही टाकी फुल्ल करण्याआधी एकदा आजचे दर काय आहेत ते नक्की तपासा. आज 5 राज्यांमध्ये पेट्रोल-डिझेल चे दर वाढले आहेत. त्यामुळे तुमच्या शहरात आज नक्की किती दर आहेत ते कसे पाहायचे याबाबत जाणून घेऊया. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या आहेत. ब्रेंटट क्रूडचे भाव वाढून आता 88.92 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचला आहे. तर WTI साठी 83.49 डॉलर प्रति बॅरल मोजावे लागत आहेत. त्यामुळे सरकारी तेल कंपन्यांनी काही राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवले आहेत. बिहारमध्ये पेट्रोल 36 पैशांनी वाढून 109.23 रुपये लिटर आणि डिझेल 34 पैशांनी वाढून 95.88 रुपये लिटर झाले आहे. छत्तीसगडमध्ये पेट्रोल 0.16 रुपयांनी वाढून 103.58 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 96.55 रुपये प्रति लिटर झाले आहे. मध्य प्रदेशात पेट्रोल पुन्हा एकदा 110.00 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे. त्यात 0.38 रुपयांची वाढ झाली असून डिझेल 0.36 रुपयांनी वाढून 95.17 रुपये लिटरमागे मोजावे लागत आहेत. महाराष्ट्रात पेट्रोल 0.32 रुपयांनी वाढून 106.64 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 0.31 रुपयांनी वाढून 93.15 रुपये प्रती लिटर झाले आहे. पश्चिम बंगालमध्येही पेट्रोलच्या दरात 0.44 रुपयांची वाढ झाली आहे. येथे आता पेट्रोल 107.26 रुपये/लिटर दराने विकले जात आहे आणि डिझेल 0.41 रुपयांनी वाढून 93.90 रुपये मोजावे लागत आहेत.
देशातील चार महागनर दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता इथे कोणताही बदल झाला नाही. या चार राज्यांमधील पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे इथल्या नागरिकांना थोडा दिलासा मिळाला आहे. रोज सकाळी ६ वाजता पेट्रोल आणि डिझेलचे दर बदलतात. त्यावर टॅक्स आणि एक्साइज ड्यूटी, डीलर कमीशन वॅट अशा अनेक गोष्टी लागून त्याचे भाव जास्त होत असतात. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढतात. तुम्हाला घसबसल्याही तुमच्या शहरातील दर तपासता येऊ शकतात. तुम्ही SMSद्वारे पेट्रोल डिझेलचे रोजचे दर तपासू शकता. इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9224992249 या क्रमांकावर पाठवून माहिती मिळवू शकतात. BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 या क्रमांकावर पाठवला तर माहिती मिळू शकते. त्याच वेळी, HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड लिहून आणि 9222201122 या क्रमांकावर मेसेज पाठवून तुमच्या शहरातील दर चेक करू शकता.