JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनी / Gold Price Today: दोन दिवसांनी सोन्याचांदीला झळाळी, या आठवड्यात दर आणखी वाढण्याची शक्यता

Gold Price Today: दोन दिवसांनी सोन्याचांदीला झळाळी, या आठवड्यात दर आणखी वाढण्याची शक्यता

Gold Silver Rate Today 21 October 2020: डॉलर इंडेक्समध्ये झालेली घसरण आणि अमेरिकेतील आर्थिक पॅकेजसंदर्भात निर्माण झालेल्या आशेमुळे सोन्याचांदीच्या दरात चांगली तेजी आली आहे.

0107

अमेरिकेतील आर्थिक पॅकेजबाबत सकारात्मक बदल घडून येत असल्याने त्याचा परिणाम शेअर बाजार आणि कमोडिटी मार्केटवर पाहायला मिळत आहे. दोन दिवसांच्या घसरणीनंतर देशांतर्गत वायदे बाजारात एमसीएक्सवर सोन्याच्या किंमती वधारलेल्या पाहायला मिळाल्या

जाहिरात
0207

आज सुरुवातीच्या सत्रात एमसीएक्सवर डिसेंबर डिलिव्हरीचे सोने 0.27 टक्क्यांनी वाढून 51,047 प्रति तोळावर पोहोचले होते. तर चांदीचे दर 0.6 टक्क्यांनी वाढून 63,505 रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचले आहेत. आधीच्या सत्रात सोने 0.45 टक्के तर चांदी 1.6 टक्के दराने वधारली आहे.

जाहिरात
0307

तज्ज्ञांच्या मते अमेरिकेत जर स्टिम्यूलस पॅकेजची घोषणा केली गेली तर येणाऱ्या काळात डॉलर इंडेक्समध्ये मोठी घसरण होऊ शकते. ज्यामुळे सोनेचांदीला चांगला सपोर्ट मिळू शकतो. त्यांच्या मते क्लोजिंग बेसिसवर एमसीएक्सवर सोन्यामध्ये 50,550 रुपयांचा सपोर्ट आहे आणि जर किंमत 50,800 रुपयांवर कायम राहिली तर 51,050-51,100 रुपयाचा उच्च स्तक गाठू शकते. चांदीला देखील 62,000 रुपयांचा सपोर्ट आहे. चांदीचे दर 63,200 रुपयांच्या वर राहिल्यास किंमत 64,000-64,500 वर जाऊ शकतात.

जाहिरात
0407

आज भारतात महाग होऊ शकते सोने- आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत 0.3 टक्क्याने वाढून 1,912.11 डॉलर प्रति औंस झाली आहे. तर चांदी 0.7 टक्क्याने वाढून 24.82 डॉलर प्रति औंस आणि प्लॅटिनमची किंमत 0.3 टक्क्याने वाढून 873.89 डॉलर झाली आहे. परिणामी देशांतर्गत बाजारात देखील सोन्याचे दर वाढू शकतात.

जाहिरात
0507

सोन्याचे नवे दर- HDFC सिक्योरिटीजच्या मते दिल्लीतील सराफा बाजारात 99.9 टक्के शुद्धतेच्या सोन्याची किंमत मंगळवारी 268 रुपये प्रति तोळाने कमी झाल्या आहेत. यांनतर सोन्याचे दर 50,860 रुपये प्रति तोळा झाले आहेत. तर सोमवारी सोन्याच्या किंमतीचे ट्रेडिंग 51,128 रुपये प्रति तोळावर बंद झाले होते.

जाहिरात
0607

चांदीचे नवे दर-मंगळवारी चांदीचे दर देखील कमी झाले आहेत. चांदी 1126 रुपयांनी स्वस्त झाली आहे. या घसरणीनंतर चांदीचे दर 62,189 रुपये प्रति किलोग्रॅम झाले आहेत. तर सोमवारी चांदीचे दर 63,315 रुपये प्रति किलोग्रॅमवर ट्रेड करत होते.

जाहिरात
0707

तज्ज्ञांच्या मते फेस्टीव्ह सीझनमुळे देशातील सोन्याची मागणी वाढली आहे. अमेरिकेत निवडणुकीआधी आर्थिक पॅकेजसंदर्भात निर्माण झालेल्या आशा आणि अमेरिका-चीन मधील तणावाचा परिणाम देखील सोन्याच्या दरावर होऊ शकतो.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या