JOIN US
मराठी बातम्या / मनी / पेट्रोल-डिझेल महागच, 'हे' आहेत आजचे दर

पेट्रोल-डिझेल महागच, 'हे' आहेत आजचे दर

Petrol, Diesel - पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढलेल्याच आहेत. त्यामागचं कारण समजून घ्या

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 16 सप्टेंबर : आठवड्याच्या सुरुवातीला पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत काही बदल झालेला नाही. रविवारी या किमती वाढल्या होत्या. रविवारी चार महानगरांमध्ये पेट्रोलच्या किमती 6 ते 7 पैसे प्रति लीटर वाढल्या होत्या. डिझेलच्या दरात 6 पैसे प्रति लीटर वाढ झाली होती. आज (16सप्टेंबर) दिल्लीत पेट्रोलचे दर 72.03 रुपये प्रति लीटर झालेत. तर डिझेल 65.43 रुपये प्रति लीटर झालंय. सौदी अरेबियाची सरकारी तेल कंपनी अरामकोच्या दोन मोठ्या ठिकाणांवर शनिवारी ड्रोन हल्ला झाला होता. त्यानंतर कच्च्या तेलाच्या किमती गेल्या 4 महिन्यात सर्वात जास्त वाढल्या होत्या. आधार कार्डातल्या ‘या’ 6 गोष्टी बदलताना लागत नाहीत कुठलीच कागदपत्र इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार मुंबई, कोलकाता आणि चेन्नई इथे पेट्रोलचे दर वाढलेत. ते क्रमश: 77.71 रुपये, 74.76 रुपये आणि 74.85 रुपये प्रति लीटर झालेत. चार महानगरांमध्ये डिझेलचे दर क्रमश: 68.62 रुपये, 67.84 रुपये आणि 69.15 रुपये प्रति लीटर झालेत. गेल्या आठवड्यात पेट्रोल-डिझेल 4 वेळा महाग झालंय. दिल्लीत पेट्रोल एकूण 21 पैसे प्रति लीटर महाग तर डिझेल 23 पैसे महाग झालंय.याचा परिणाम नेहमीच्या गरजेच्या वस्तू महाग होण्यावर होतो. त्याची झळ सर्वसामान्यांना लागते. खूशखबर! रुपे डेबिट कार्डानं शाॅपिंग करा आणि मिळवा ‘इतका’ फायदा रोज पेट्रोल - डिझेलच्या किमतींचं समीक्षण करून सकाळी 6 वाजता नव्या किमती घोषित करतात. या किमती आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती आणि अमेरिकन डाॅलर्सचे भाव यावर ठरवल्या जातात. मूळ किंमतींमध्ये अबकारी कर (excise duty), डीलर कमीशन या सर्व बाबी मिळून इंधनाच्या दरामध्ये वाढ होते. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमतीवर भारतात पेट्रोल-डिझेलचे दर अवलंबून असतात. अर्थमंत्र्यांनी घर खरेदीसाठी केली मोठी घोषणा आपल्या शहरातील इंधनाचे दर असे तपासा विशेष नोंदणीकृत क्रमांकावर SMS पाठवून तुम्हाला तुमच्या शहरातील इंधनाच्या दरांबाबत माहिती मिळवता येईल. पण ही सुविधा आपल्या फोनवरून उपलब्ध व्हावी, यासाठी एसएमएस पाठवण्यापूर्वी तुम्हाला कोणत्याही पेट्रोल पंपावरून डीलर कोड घ्यावा लागेल. SMS सुविधा मिळवण्यासाठी कोड असणं आवश्यक आहे. बीपीसीएल ग्राहक  RSP<डीलर कोड> 9223112222 एचपीसीएल ग्राहक HPPRICE<डीलर कोड> 9222201122 या क्रमांकावर सुविधा पाठवून तुम्हाला इंधनाचे दर स्मार्टफोनवरच मिळवता येतील. बंगल्यात घुसून बिबट्यानं केली कुत्र्याची शिकार; पाहा VIDEO

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या