JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनी / या शेतकऱ्यांंनाही मिळालेत PM Kisan चे हप्ते? परतफेड करण्यासाठी राहा तयार, असा आहे नियम

या शेतकऱ्यांंनाही मिळालेत PM Kisan चे हप्ते? परतफेड करण्यासाठी राहा तयार, असा आहे नियम

PM Kisan Samman Nidhi: ज्यांनी चुकीच्या पद्धतीने पैसे घेतले असतील त्यांना ते परत करावे लागत आहेत. केंद्राने काही निश्चित शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही, असे सांगितले आहे. तरी देखील त्यांनी लाभ घेतला असल्यास सरकार त्यांच्याकडून वसुली करत आहे.

019

शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याच्या उद्देशाने मोदी सरकारने (Modi Government) काही योजना सुरू केल्या आहेत. दरम्यान यापैकी एक महत्त्वाकांक्षी योजना म्हणजे पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना (PM Kisan samman nidhi) आहे. पीएम शेतकरी सन्मान निधी योजना देशातील गरीब शेतकऱ्यांना (Farmers) बी-बियाणं, खतं खरेदी करण्याकरता निधी मिळावा याकरता राबवली जाते.

जाहिरात
029

तप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत (PM Kisan Samman Nidhi Scheme) दिला जाणारा एप्रिल-जुलै दरम्यानचा हप्ता बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचला आहे. दरम्यान काही शेतकऱ्यांना यावेळी देखील रक्कम मिळालेली नाही

जाहिरात
039

दरम्यान जे या लाभास पात्र नाहीत तरीही ज्यांनी लाभ घेतला, सरकारने त्यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. सरकारने चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्या तमिळनाडू, महाराष्ट्रा, मध्य प्रदेश, गुजरात आणि हिमाचल प्रदेशमधील शेतकऱ्यांकडून वसुली केली आहे.

जाहिरात
049

अशा शेतकऱ्यांची नावं लाभार्थ्यांच्या यादीमधून देखील हटवण्यात आली आहे. ज्यांनी चुकीच्या पद्धतीने पैसे घेतले असतील त्यांना ते परत करावे लागत आहेत. केंद्राने काही निश्चित शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही, असे सांगितले आहे. तरी देखील त्यांनी लाभ घेतला असल्यास सरकार त्यांच्याकडून वसुली करत आहे.

जाहिरात
059

कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार नाही PM Kisan योजनेचा लाभ- 1)तुमच्या नावावर शेत नसेल तर: पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांच्या नावावर जमीन असणं आवश्यक आहे. जर एखादा शेतकरी शेती करत असेल पण त्याच्या नावावर शेत नसेल तर त्याला या योजनेचा लाभ मिळणार नाही. जर शेत त्या शेतकऱ्याचे वडील किंवा आजोबांच्या नावे असेल तरी देखील या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

जाहिरात
069

2)या शेतकऱ्यांना मिळणार नाही फायदा: जर एखादा शेतकरी त्या जमिनीचा मालक आहे पण तो सरकारी कर्मचारी आहे किंवा निवृत्त झाला आहे तर त्याला या योजनेचा लाभ घेता येणार नाही. शिवाय आजी-माजी आमदार, खासदार, मंत्री यांना देखील PM शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ मिळणार नाही. याशिवाय प्रोफेशनल रजिस्टर्ड डॉक्टर, इंजिनिअर, वकील, चार्टर्ड अकाउंटंटना किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.

जाहिरात
079

3)10000 रुपयांपेक्षा अधिक पेन्शन असणाऱ्यांना मिळणार नाही फायदा- शेतजमीन तुमच्या मालकीची असली तरी तुम्हाला जर 10000 रुपये पेन्शन दरमहा मिळत असेल तर तुम्हा या योजनेचे लाभार्थी होणार नाही. इन्कम टॅक्स भरणाऱ्या कुटुंबाला देखील या योजनेचा लाभ घेता येणार नाही

जाहिरात
089

4) यांना लाभ मिळू शकत नाही: जे शेतीतील कामाऐवजी इतर कामांसाठी शेतजमीन वापरत आहेत.खेड्यांतील बरेच शेतकरी इतरांच्या शेतात शेतीची कामे करतात पण शेतांचे मालक नाहीत. पिकाचा भाग किंवा पैसा शेताच्या मालकास देतात. असे शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत.

जाहिरात
099

छोट्या आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना लाभ- या मार्गदर्शक तत्वांनुसार लहान आणि अल्पभूधारक शेतकर्‍यांना लाभ मिळेल. यामध्ये असे कुटुंब परिभाषित केले आहे ज्यात पती, पत्नी आणि अल्पवयीन मुलं एकत्रितपणे दोन हेक्टर किंवा त्याहून कमी क्षेत्राची, संबंधित राज्य किंवा केंद्र शासित प्रदेशाच्या भूमी अभिलेखानुसार शेती करतात.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या