JOIN US
मराठी बातम्या / मनी / अकाउंटमध्ये शून्य रक्कम असली तरी काढता येणार पैसे; जाणून घ्या कसं

अकाउंटमध्ये शून्य रक्कम असली तरी काढता येणार पैसे; जाणून घ्या कसं

अडचणीच्या काळात पैशांची अत्यंत निकडीची गरज भासू शकते. अशा वेळी बँक खातंही रिकामं असेल तर अनेकांची फजिती होते. त्यावेळी नातेवाईक किंवा मित्रमंडळींकडून पैसे उधार घेतल्याशिवाय गत्यंतर राहत नाही. पण एखाद्या व्यक्तीला हा पर्यायही मान्य नसेल तर दुसरा एक सोपा उपाय आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 21 जुलै-   अडचणीच्या काळात पैशांची अत्यंत निकडीची गरज भासू शकते. अशा वेळी बँक खातंही रिकामं असेल तर अनेकांची फजिती होते. त्यावेळी नातेवाईक किंवा मित्रमंडळींकडून पैसे उधार घेतल्याशिवाय गत्यंतर राहत नाही. पण एखाद्या व्यक्तीला हा पर्यायही मान्य नसेल तर दुसरा एक सोपा उपाय आहे. बँक खातं रिकामं असलं तरीही बँकेच्या ओव्हरड्राफ्ट सुविधेचा लाभ घेऊन आपण पैशांची गरज भागवू शकतो.ओव्हरड्राफ्ट सुविधेला आपण कमी कालावधीचं कर्ज समजू शकतो. खात्यावर झीरो बॅलन्स असला तरी खातेधारक त्याच्या खात्यातून पैसे काढू शकतो. बहुतेक सर्वच शासकीय आणि खासगी बँकांमध्ये ओव्हरड्राफ्टची सुविधा उपलब्ध असते. चालू खातं, पगाराचं खातं  किंवा मुदत ठेवीवर बँका ओव्हरड्राफ्ट देतात. काही बँकांमध्ये तर शेअर, बाँड, पगार, विमा, घर, संपत्ती आदींवरही ओव्हरड्राफ्ट उपलब्ध करून दिला जातो. किती असते ओव्हरड्राफ्टची मर्यादा? ओव्हरड्राफ्टची सुविधा घेतल्यास खातेधारकाला नेमकी किती रक्कम मिळू शकते, असा प्रश्न नेहमी विचारला जातो. यात प्रामुख्याने आपण गहाण काय ठेवणार आहोत त्यावर ओव्हरड्राफ्टची मर्यादा ठरलेली असते. उदा. मुदत ठेव, शेअर किंवा इतर काही सामान गहाण ठेवल्यानंतर ओव्हरड्राफ्ट मिळू शकते. याच आधारावर व्याजही निश्चित केलं जातं. समजा बँकेत आपल्याकडे 2 लाख रुपयांची एफडी असेल तर जवळपास दीड लाख रुपयांपर्यंत ओव्हरड्राफ्ट मिळू शकते. शेअर, बाँड आणि डिबेंचरमध्ये ही रक्कम कमी किंवा जास्त असू शकते. अर्थात प्रत्येक बँकेचे नियम वेगळे असतात त्यानुसार ही ओव्हरड्राफ्टची रक्कम बदलू शकते. कर्जाप्रमाणे करावा लागेल अर्ज ओव्हरड्राफ्टची सुविधा घेण्यासाठी बँका त्यांच्या ग्राहकांना मेसेज किंवा ई-मेलच्या माध्यमातून माहिती देत असतात. बँकांकडून आधीपासूनच ओव्हरड्राफ्टची मर्यादा निश्चित केली जाते. निकडीची गरज भासल्यास इतर वेळी कर्ज घेताना जशी अर्ज प्रक्रिया केली जाते तीच पद्धत ओव्हरड्राफ्टसाठीही लागू असते. गरज असेल तेव्हा ओव्हरड्राफ्टच्या माध्यमातून रक्कम तर निश्चित मिळते. परंतु, ओव्हरड्राफ्टही एखाद्या कर्जाप्रमाणेच आहे. कर्ज घेतल्यानंतर त्याची फेड जशी व्याजासहित केली जाते. अगदी त्याच पद्धतीने ओव्हरड्राफ्टच्या बाबतीत हिच बाब लागू पडते. (**हे वाचा:** Multibagger Share: गुंतवणूकदार ‘या’ शेअरमुळे मालामाल, 1 लाख रुपये बनले 28 कोटी ) दोघांना मिळून घेता येऊ शकतो ओव्हरड्राफ्ट ओव्हरड्राफ्टची सुविधा दोघांना मिळून घेता येऊ शकते. अशावेळी घेतलेल्या रकमेची फेड करण्याची जबाबदारी एकट्या तुमच्यावर नसते. परंतु, दोघांपैकी एकाने रक्कम फेडली नाही तर दुसऱ्याला पूर्ण रक्कम देणं भाग असतं. काही कारणास्तव तुम्ही ओव्हरड्राफ्ट घेतलेली रक्कम फेडू शकला नाहीत, तर गहाण ठेवलेल्या वस्तूंमधून त्याची भरपाई केली जाते. ओव्हरड्राफ्टची रक्कम गहाण ठेवलेल्या वस्तूच्या मूल्यापेक्षा जास्त असेल तर उर्वरित रक्कम तुम्हाला देणं गरजेचं असतं. बँकांमध्ये ज्यांचं पगाराचं अकाउंट आहे त्यांना अगदी सहजरित्या ओव्हरड्राफ्टच्या सुविधेचा लाभ घेता येतो. यासाठी कंपनीकडून तुमच्या खात्यात किमान 6 वेळा पगार जमा झालेला असणं गरजेचं असतं. या व्यतिरिक्त बँकेत एफडी असेल तरी तुम्हाला ओव्हरड्राफ्टचा फायदा घेता येऊ शकतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या