JOIN US
मराठी बातम्या / मनी / TDS Refund: जास्त टीडीएस कापला गेलाय? 'या' सोप्या पद्धतीनं परत मिळू शकतात पैसे

TDS Refund: जास्त टीडीएस कापला गेलाय? 'या' सोप्या पद्धतीनं परत मिळू शकतात पैसे

TDS Refund Claim: तुमचा अतिरिक्त टीडीएस कापला गेला तर तुम्ही काय कराल? जर तुमच्यासोबतही असं झालं असेल तर अशा परिस्थितीत तुम्ही तुमचे कापलेले पैसे परत मिळवू शकतात.

जाहिरात

TDS Refund: जास्त टीडीएस कापला गेलाय? 'या' सोप्या पद्धतीनं परत मिळू शकतात पैसे

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 23 जुलैः आजच्या युगात तुम्हाला पैसे कमवायचे असतील, तर त्यासाठी तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागतील. याचा अर्थ, जर तुम्ही कठोर परिश्रम केले तर तुम्ही पैसे कमवू शकाल. तुम्ही नोकरी करू शकता, व्यवसाय करू शकता किंवा तुमचं कोणतंही काम करू शकता इ. या मार्गांनी पैसा मिळवता येतो. जर नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर त्यांची संख्या खूप जास्त आहे. महिनाभर काम केल्यानंतर लोकांना पगार मिळतो. त्याचबरोबर या पगारातून लोकांचा टीडीएसही कापला जातो. TDS म्हणजे टॅक्स डिडक्शन अ‍ॅट सोर्स होय.  दर महिन्याच्या पगारातून टीडीएस कापला जातो. पण जरा कल्पना करा की तुमचा अतिरिक्त टीडीएस कापला गेला तर तुम्ही काय कराल? जर तुमच्यासोबतही असं झालं असेल तर अशा परिस्थितीत तुम्ही तुमचे कापलेले पैसे परत मिळवू शकतात. चला तर मग टीडीएसच्या स्वरूपात कापलेले पैसे परत कसे मिळवायचे. कंपन्या ठराविक काळापर्यंत कर्मचाऱ्यांचा टीडीएस कापावा लागतो. त्यासाठी प्रत्येक महिन्याच्या पगारातून कपात केली जाते. जर एखाद्या कर्मचाऱ्याने त्याच्या गुंतवणुकीचा पुरावा कंपनीकडे सादर केला नाही, तर कंपनी आपल्या ठरवलेल्या नियमांनुसार कर कपात करते. हेही वाचा-   SBI WhatsApp Banking : आता बँकेत जाण्याची गरजच नाही; WhatsApp वरच करा बँकेची ही कामं जादा टीडीएस कापला गेल्यास काय करायचं? जर तुम्ही तुमच्या पगारातून जास्त टीडीएस कापला गेला असेल तर तो परत मिळवण्यासाठी तुम्ही आयकर रिटर्न भरून तो परत मिळवू शकता. हे दाखल करण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2022 ठेवण्यात आली आहे. टीडीएस परतावा मिळविण्यासाठी, तुम्ही आयकर रिटर्न भरणं आवश्यक आहे. विवरणपत्र भरताना कपात केलेली जादा रक्कम नमूद केल्याची खात्री करा. याशिवाय, तुम्ही 15G फॉर्म भरून आणि बँकेत जमा करून TDS पैसे परत मिळवू शकता. तुम्ही असा करू शकता क्लेम: स्टेप 1 - TDS चा क्लेम करण्यासाठी, तुम्हाला प्रथम तुमचा ITR फाइल करावा लागेल. स्टेप 2- त्यानंतर तुम्हाला पेमेंट स्टेटस मिळवण्यासाठी www.incometax.gov.in या लिंकला भेट द्यावी लागेल. त्यानंतर तुमचा यूजर आयडी आणि पासवर्ड टाका. स्टेप 3- आता तुम्हाला ‘ई-फायलिंग’ या पर्यायावर क्लिक करावं लागेल. त्यानंतर ‘View file returns’ या पर्यायावर क्लिक करा. यानंतर तुम्हाला ITR ची माहिती दिसेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या