JOIN US
मराठी बातम्या / मनी / उन्हाळ्यात AC ला विसरा, वीजबिलही फोडणार नाही घाम, 'हा' आहे स्वस्त पर्याय

उन्हाळ्यात AC ला विसरा, वीजबिलही फोडणार नाही घाम, 'हा' आहे स्वस्त पर्याय

उन्हाळा सुसह्य करण्यासाठी आता बाजारात कूलिंग जेल बेडशीट्स मिळत आहेत. त्याला कूलिंग जेल मॅट्रेस असंही म्हणतात.

जाहिरात

उन्हाळ्यात ‘हे’ देईल थंडावा, एसी, कूलरला स्वस्त पर्याय

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई : गेले काही दिवस सुरू असलेल्या पावसामुळे हवेत आलेला गारवा जाऊन आता मे महिन्याचं कडक ऊन पडू लागलंय. तापमान चाळीशीपार पोहोचलंय. घरोघरी कूलर, एसीचा वापर वाढू लागलाय. यामुळे थंडावा तर मिळतो, मात्र वीज बिल भयंकर वाढतं. त्यावर उपाय म्हणून बाजारात कूलिंग जेल बेडशीट्स उपलब्ध झाली आहेत. तुमच्या बेडवर हे बेडशीट घातलं, तर उन्हाच्या झळांपासून काही काळ सुटका होऊन आल्हाददायक थंडावा मिळतो. उन्हाळा सुसह्य करण्यासाठी आता बाजारात कूलिंग जेल बेडशीट्स मिळत आहेत. त्याला कूलिंग जेल मॅट्रेस असंही म्हणतात. बेडवर हे बेडशीट घातल्यानं थंड हवा तुम्हाला मिळते. हे ऑनलाईन किंवा ऑफलाईन दोन्ही प्रकारे खरेदी करता येऊ शकतं. विशेषतः अ‍ॅमेझॉनवर के कूलिंग जेल मॅट्रेस स्वस्त मिळू शकतं. सर्वसाधारणपणे याची किंमत 1500 रुपयांच्या आसपास असते. मात्र अ‍ॅमेझॉनवर यापेक्षाही कमी किमतीत हे मिळू शकतं. कशी येते थंड हवा? या मॅट्रेसमध्ये जेल टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आलाय. सॉकेटमध्ये लावल्यावर काही मिनिटांमध्ये गारवा जाणवू लागतो. विशेष म्हणजे त्यावर झोपल्यावर कोणतंही व्हायब्रेशन किंवा आवाज येत नाही. आवाज न करता हे बेडशीट गारवा निर्माण करतं. ही कूलिंग जेल मॅट्रेस तुम्ही तुमच्या बेडशीटच्या खाली घालू शकता. त्यामुळे ती खराब होण्याचा धोका नसेल.

आता तुमच्या हातात असेल फोल्डेबल फोन, सॅमसंगच्या या मॉडलवर मिळतेय बंपर सूट!

स्वच्छता कशी कराल? कूलिंग जेल मॅट्रेस नेहमीच्या बेडशीटप्रमाणे धुवून स्वच्छ करता येत नाही. त्याला कोरड्या फडक्यानं स्वच्छ करावं लागतं. ओल्या फडक्याचा उपयोग केल्यास कदाचित ते खराब होऊ शकतं. याचा उपयोग बहुतेककरून उन्हाळ्यातच केला जातो. यामुळे इतका गारवा निर्माण होतो, की काही वेळेला झोपताना पांघरूण घेण्याची गरजही भासू शकते.

कूलरचा वॉटर पंप बंद पडलाय? फक्त 5 रुपयांत घरबसल्या असा करा दुरुस्त

संबंधित बातम्या

उन्हाळ्यात एसी किंवा कूलरच्या किमती भरपूर वाढतात. त्यामुळे आधीच खिशावर भार वाढतो, त्यात एसी आणि कूलरमुळे वीज बिलही वाढतं. त्यावर पर्याय म्हणून कूलिंग जेल मॅट्रेस हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. अर्थात त्याचा उपयोग झोपण्यावेळीच अधिक होतो. मात्र उन्हाळ्यात रात्रीच्या वेळी यामुळे शांत झोप नक्की लागू शकते. कूलिंग जेल मॅट्रेस दुकानांमध्येही उपलब्ध आहेत. मात्र ऑनलाईन घेऊन तुम्ही आणखी पैसे वाचवू शकता. यातल्या जेल टेक्नॉलॉजीमुळे बेडवर थंडावा निर्माण होतो. उन्हाळा सुसह्य करण्यासाठी हा नक्कीच चांगला पर्याय ठरू शकतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या