JOIN US
मराठी बातम्या / मनी / Success Story: कधीकाळी मुंबईच्या चाळीत राहायची 'ही' व्यक्ती, आज आहे भारतातील हाउसिंग फायनान्स क्षेत्राची जनक

Success Story: कधीकाळी मुंबईच्या चाळीत राहायची 'ही' व्यक्ती, आज आहे भारतातील हाउसिंग फायनान्स क्षेत्राची जनक

1936 मध्ये भारतात परतल्यानंतर पारेख यांनी हरकिसनदास लुखमिदास या आघाडीच्या स्टॉक ब्रोकिंग फर्ममध्ये नोकरी करून आपल्या आर्थिक क्षेत्रातील कारकिर्दीला सुरुवात केली.

जाहिरात

सक्सेस स्टोरी

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली : नुकतंच एचडीएफसी बँक आणि तिची मूळ कंपनी हाउसिंग अँड डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशनचं (एचडीएफसी) मेगा-विलीनीकरण पार पडलं. बँकिंग क्षेत्रातील ही सर्वांत मोठी बातमी होती. बँक आणि कंपनीचं विलीनीकरण झाल्यामुळे एक आर्थिक पॉवरहाउस तयार झालं आहे. 4.14 लाख कोटी रुपयांचं बाजार भांडवल असलेली एचडीएफसी बँक ही जगातील चौथी सर्वांत मोठी बँक बनली आहे. या घडामोडी दरम्यान हसमुख ठाकोरदास पारेख ही व्यक्ती प्रकाशझोतात आली आहे. भारतातील हाउसिंग फायनान्सचा प्रणेता अशी पारेख यांची ओळख आहे. 1977 मध्ये त्यांनी हाउसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशनची स्थापना केली होती. ‘डेली हंट’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. गुजरातमधील सुरत येथील बँकिंगची पार्श्वभूमी असलेल्या एका कुटुंबात 10 मार्च 1911 रोजी हसमुख ठाकोरदास पारेख यांचा जन्म झाला. त्यांना वडिलांकडून गुजराती व्यावसायिक कौशल्याचा वारसा मिळाला. मात्र, त्यांच्यावर आईचा खूप जास्त प्रभाव होता. आपल्या कुटुंबासह मुंबईच्या चाळीत लहानचं मोठं होत असताना पारेख यांनी काही पार्टटाईम नोकऱ्या केल्या. काम करत-करत त्यांनी मुंबई विद्यापीठातून अर्थशास्त्राची पदवी मिळवली. उच्च शिक्षणासाठी ते लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये गेले आणि बी.एस्सी. बँकिंग अँड फायनान्स विषयात पदवी मिळवली. 1936 मध्ये भारतात परतल्यानंतर पारेख यांनी हरकिसनदास लुखमिदास या आघाडीच्या स्टॉक ब्रोकिंग फर्ममध्ये नोकरी करून आपल्या आर्थिक क्षेत्रातील कारकिर्दीला सुरुवात केली. त्याचबरोबर त्यांनी मुंबईतील सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये अर्थशास्त्राचे व्याख्याता म्हणून सुमारे तीन वर्षे काम केलं. ब्रोकिंग फर्ममधील दोन दशकांच्या कार्यकाळात त्यांच्या कारकिर्दीला आकार मिळाला आणि त्यांना व्यवसायातील सर्वात मूलभूत धडे मिळाले. HDFC च्या माजी अध्यक्षांचं पहिलं ऑफर लेटर व्हायरल; 45 वर्षांपूर्वी किती होता पगार? आयसीआयसीआयमध्ये काम 1956 मध्ये ते आयसीआयसीआयमध्ये उपमहाव्यवस्थापक (डेप्युटी जनरल मॅनेजर) म्हणून रुजू झाले. ही त्यांना मिळालेली पहिला मोठी संधी होती. 1972 मध्ये ते बँकेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक झाले. 1976 मध्ये ते आयसीआयसीआयमधून निवृत्त झाले होते. 1978 पर्यंत आयसीआयसीआयच्या बोर्डाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं. एचडीएफसीची स्थापना मध्यमवर्गीय भारतीयांना वृद्ध होण्याच्या अगोदर घर बांधण्याची संधी मिळावी अशी पारेख यांची इच्छा होती. याच विचारातून त्यांनी 1977 मध्ये वयाच्या 65 व्या वर्षी हाउसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड (एचडीएफसी) ही भारतातील पहिली रिटेल हाउसिंग फायनान्स कंपनी स्थापन केली. इंडस्ट्रीयल क्रेडिट अँड इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे (आयसीआयसीआय) अध्यक्ष म्हणून निवृत्त झाल्यानंतर लगेचच त्यांनी एचडीएफसीची स्थापना केली होती. 10 हजार रुपयांच्या वैयक्तिक योगदानासह आणि भारत सरकारच्या कोणत्याही आर्थिक मदतीशिवाय पारेख यांनी भारताची पहिली रिटेल हाउसिंग फायनान्स कंपनी स्थापन केली. पारेख यांच्या डायनॅमिक नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली, एक कंपनी म्हणून एचडीएफसी अनेक पटींनी वाढली. कारण, प्रामाणिकपणा, पारदर्शकता आणि व्यावसायिकतेच्या तत्त्वांवर टिकून राहून कंपनीनं आपला कारभार केला. KFC चे संस्थापक कोण? हा ब्रँड जगभरात इतका लोकप्रिय कसा झाला? वाचा त्यांची यशोगाथा टीम बिल्डर ज्यांच्याकडे प्रतिभा होती त्यांना दिशा आणि भरपूर शिकण्याच्या संधी देऊन पारेख यांनी त्यांचं एक प्रकारे व्यावसायिक संगोपन केलं. कारण, त्यांचा टीमवर्कच्या सामर्थ्यावर जास्त विश्वास होता. त्यांचा असा विश्वास होता की, एखाद्या संस्थेचं यश हे तेथील कर्मचाऱ्यांच्या टीमवर्कवर अवलंबून असतं. एक अशी टीम जिनं सेवा करण्याचं एक समान ध्येय ठेवलं आहे आणि जी वाजवी जोखीम घेण्यास तयार आहे. 1978 मध्ये पहिलं होमलोन वितरित केलेल्या एचडीएफसीनं 1984 पर्यंत 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त वार्षिक कर्ज मंजूर केली होती. पारेख यांच्या प्रयत्नांमुळे लवकरच संपूर्ण आशियामध्ये होम फायनान्स क्षेत्रात एचडीएफसी एक आदर्श संस्था ठरली. लोकांसाठी उत्तम घरे आणि राहण्याची परिस्थिती उपलब्ध करून देण्याचं पारेख यांचं स्वप्न त्याच क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या धाटणीच्या पण मनापासून भारतीयत्वाची भावना असलेल्या संस्थेनं म्हणजे एचडीएफसीनं पूर्ण केलं. 1983 मध्ये, त्यांनी हिंदुस्थान ऑइल एक्सप्लोरेशन कंपनी लिमिटेड (HOEC) या भारतातील पहिल्या खासगी क्षेत्रातील तेल उत्खनन कंपनीची जाहिरात केली. त्यांनी 1986 मध्ये गुजरात रूरल हाउसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडची (GRUH) स्थापना केली. जी गावं आणि लहान शहरांमध्ये ग्रामीण गृहनिर्माण वित्तपुरवठा करणारी संस्थात्मक संरचना आहे. पारेख यांनी जवळपास 16 वर्षे आएमसी इकॉनॉमिक रिसर्च अँड ट्रेनिंग फाउंडेशनचे अध्यक्ष म्हणूनही काम केलं. पद्मभूषण एचडीएफसी ही हसमुख ठाकोरदास पारेख यांची बुद्धीतून आलेली कल्पना होती. या कंपनीनं भारतातील हाउसिंग फायनान्सच्या उत्क्रांतीच्या काळातील अनेक अडथळ्यांवर मात करत खूप मोठा पल्ला गाठला आहे. भारतातील हाउसिंग फायनान्स आणि बँकिंग क्षेत्रातील त्यांच्या अमूल्य योगदानासाठी, पारेख यांना 1992 मध्ये भारत सरकारनं पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित केलेलं आहे. शिवाय, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सनं त्यांना मानद फेलोशिप देखील प्रदान केली. 18 नोव्हेंबर 1994 रोजी पारेख यांचं निधन झालं आणि एचडीएफसी तसेच भारतीय आर्थिक क्षेत्रातील एका युगाचा अंत झाला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या