JOIN US
मराठी बातम्या / मनी / success story: वयाच्या 22 व्या सुरू केली स्वत:ची कंपनी, कोट्यवधींची उलाढाल अन् बनला करोडपती

success story: वयाच्या 22 व्या सुरू केली स्वत:ची कंपनी, कोट्यवधींची उलाढाल अन् बनला करोडपती

अवघ्या चार वर्षांत या तरुणानं मेहनतीच्या बळावर या कंपनीची उलाढाल कोट्यांवधी रुपयांपर्यंत पोहोचवली आहे.

जाहिरात

सागर गुप्ता

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई: वय वर्ष 22 ते 26 हे खरतरं कॉलेजमध्ये जाऊन उच्च शिक्षण घेण्याचं वय! या वयातील बहुतांश तरुण कॉलेज लाइफ एंजॉय करतात. या वयात सहसा पैसे कमविण्याच्या मागे कोणी लागत नाही. पण एका तरुणानं वयाच्या 22 व्या वर्षी स्वतःची कंपनी सुरू केली. त्यानंतर अवघ्या चार वर्षांत या तरुणानं मेहनतीच्या बळावर या कंपनीची उलाढाल कोट्यांवधी रुपयांपर्यंत पोहोचवली आहे. उद्योग विश्वात यशस्वी झालेल्या या तरुणाचं नाव आहे सागर गुप्ता. तरुण वयातच सागर गुप्ताने 600 कोटी रुपयांची कंपनी स्थापन केलीय. नोएडा येथील सागर व्यवसायाचा कोणताही अनुभव नव्हता. तसंच तो कोणत्याही व्यावसायिक कुटुंबातील नाही. पण त्याने स्वतःच्या वडिलांसोबत कंपनी सुरू केली, व तिची उलाढाल करोडोवर नेली.

कोरोना काळात पतीनं गमावली नोकरी पण आता पत्नी 5 लोकांना देतेय रोजगार, नेमकं हे कसं घडलं?

सीए बनण्याची होती इच्छा सागरच्या वडिलांची इच्छा होती की, मुलानी सीए व्हावं. त्यामुळे सागरने दिल्ली विद्यापीठातील श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्समधून बी.कॉम पूर्ण केलं. तसंच सीएच्या तयारीसाठी कोचिंग घेण्यास सुरुवात केली; पण 2017 मध्ये त्यानी मॅन्युफॅक्चरिंग व्यवसायात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यानी वडिलांसोबत एलईडी टीव्ही निर्मिती युनिट सुरू करण्याचा निर्णय घेतला. वडील 3 दशकं सेमीकंडक्टर ट्रेडिंगमध्ये होते. त्यानी वयाच्या 22 व्या वर्षी 2018 मध्ये एक्का इलेक्ट्रॉनिक्स नावाची स्वतःची कंपनी सुरू केली. सध्या तो या कंपनीचे संचालक आहे. विविध कंपन्यांसाठी उत्पादन पुरवठा एक्का इलेक्ट्रॉनिक्स आज 100 हून अधिक कंपन्यांना उत्पादनांचा पुरवठा करते. यामध्ये सॅमसंग, तोशिबा, सोनी यांसारख्या कंपन्यांचासुद्धा समावेश आहे. कंपनीचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट हरियाणातील सोनीपत येथे आहे. तर, सेल्स आणि प्रॉडक्शन सुविधा नोएडा, गन्नौर आणि नाशिक येथे आहे.

रेल्वेसोबत मिळून सुरु करा बिझनेस, कधीच कमी होणार नाही ग्राहकांच्या रांगा

संबंधित बातम्या

आज त्याच्या कंपनीत 1000 हून अधिक कर्मचारी काम करतात. ही कंपनी 24 इंच ते 40 इंचापर्यंतचे एलईडी टीव्ही असेंबल करण्याच्या बाबतीत देशातील आघाडीच्या कंपन्यांमध्ये आहे. कंपनी एलसीडी, एलईडी आणि हाय एंड टीव्ही बनवते. कंपनीचा दावा आहे की, ते महिन्याला 1 लाखाहून अधिक टीव्ही बनवतात. लवकरच त्यांची कंपनी वॉशिंग मशीन, स्पीकर आणि स्मार्ट घड्याळं यांसारख्या इलेक्ट्रॉनिक गॅझेट्सच्या निर्मितीमध्ये उतरणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या