मुंबई, 7 मार्च : शेअर बाजारात (Share Market) आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मोठी घसरणी पाहायला मिळाली. फेब्रुवारीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे सुमारे 29 लाख कोटी रुपये बुडाले आहेत. रशियाचा युक्रेनवरील हल्ला आता केवळ दोन्ही देशांपुरता नाही तर जागतिक विकासासाठी मोठा धोका बनत आहे. ब्रेंट क्रूड 139 डॉलरवर, 13 वर्षांच्या उच्चांकावर कच्च्या तेलाच्या किमती (Crude Oil Price) 13 वर्षांच्या उच्चांकावर पोहोचल्या, हा भारतासारख्या उदयोन्मुख बाजारपेठांसाठी मोठा धक्का आहे. कारण भारत आपल्या तेलाच्या गरजेच्या 80 टक्के आयातीवर अवलंबून आहे. तेलाच्या किमतींमध्ये होणारी प्रत्येक वाढ ही भारतासाठी मोठी जोखीम आहे. कारण यामुळे महागाईची चिंता वाढते, व्यापार तूट वाढते आणि कॉर्पोरेट कमाई आणि आर्थिक वाढीवर परिणाम होतो. आंतरराष्ट्रीय बेंचमार्क ब्रेंट क्रूड फ्युचर्सने 7 मार्च रोजी दुपारी 139.13 डॉलरचा इंट्राडे उच्चांक गाठला, जो 2008 नंतरचा सर्वोच्च स्तर आहे. त्याच वेळी, यूएस क्रूड 130 डॉलरच्या पातळीवर पोहोचला. Share Market Crashed: शेअर बाजारातील घसरण थांबेना! Sensex 1400 अंकांनी खाली, तर Nifty 15900 वर भारताला धक्का का बसेल? CapitalVia Global Research च्या लिखिता शेपा वरिष्ठ संशोधन विश्लेषक म्हणाल्या की, ट्रेडर्स चिंतेत असतील कारण 2022 साठी भारताचा आर्थिक विकासाचा अंदाज खाजगी मूल्यांकनात 7.8 टक्क्यांपर्यंत खाली आणला गेला आहे. रशिया-युक्रेन संघर्षाचा निर्यातीवरील परिणाम तसेच क्रूडच्या किमतीत झालेली वाढ हे त्याचे कारण आहे. कच्च्या तेलाच्या संकटामुळे सोमवारी रुपया प्रति डॉलर 77.5 या विक्रमी नीचांकी पातळीवर आला. ते म्हणाले की, डॉलरच्या तुलनेत रुपया आणखी कमकुवत होऊ शकतो, परंतु वस्तूंच्या किमती वाढल्याने महागाई वाढू शकते. निफ्टीने 16 हजारांची पातळी तोडली युक्रेन संकटाशी संबंधित चिंतेमुळे जगभरातील बाजार कमजोर दिसत आहेत. शेअर बाजारातील बेन्चमार्क इंडेक्स सेन्सेक्स1491.06 अंकांनी किंवा 2.74 टक्क्यांनी घसरुन 52842.75 अंकांवर बंद झाला. तर निफ्टी 382.20 अंकांनी किंवा 2.35 टक्क्यांनी घसरुन 15863.15 अंकांवर बंद झाला. BSE चे बाजार भांडवल 2 फेब्रुवारीपासून आतापर्यंत 270.6 लाख कोटी रुपयांवरून 241.2 लाख कोटी रुपयांवर आले आहे. शेअर बाजार 7 महिन्यांच्या खालच्या पातळीवर, या पडझडीत तज्ज्ञांनी सुचवलेले टॉप पिक्स; चेक करा ऑटो, बँकिंग सर्वाधिक घसरले ब्रॉडर मार्केटमध्येही कमजोरी दिसली. निफ्टी मिडकॅप 100 आणि स्मॉलकॅप 100 निर्देशांक अनुक्रमे 2.5 टक्के आणि 2.2 टक्क्यांनी घसरले. ऑटो, बँकिंग, फायनान्शिअल सर्व्हिसेस आणि रियल्टी यांना सर्वाधिक फटका बसला असून ते 4-5 टक्क्यांनी घसरले आहेत. दुसरीकडे, मेटल आणि आयटी निर्देशांकात अनुक्रमे 0.1 टक्के आणि 0.75 टक्क्यांनी वाढ झाली.