JOIN US
मराठी बातम्या / मनी / आता ऑफिसमध्ये दररोज अर्धा तास झोपू शकतात कर्मचारी, या भारतीय कंपनीची मोठी घोषणा

आता ऑफिसमध्ये दररोज अर्धा तास झोपू शकतात कर्मचारी, या भारतीय कंपनीची मोठी घोषणा

या कंपनीने आपल्या स्टाफला ड्युटीदरम्यान थोडा वेळ झोप घेण्याची (Short Nap) ऑफर दिली आहे. या झोप घेण्याच्या वेळेत कोणत्याही कर्मचाऱ्याचा पगार, पैसेही कट केले जाणार नाहीत.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 8 मे : कोरोना काळात जगभरात कंपन्यांच्या व्यवस्थापनाच्या विचारसरणीत बराच बदल झाल्याचं चित्र आहे. आता कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांच्या सुविधांकडे अधिक लक्ष देत आहे. अशाच एका भारतीय कंपनीची सध्या चर्चा सुरू आहे. या कंपनीने आपल्या स्टाफला ड्युटीदरम्यान थोडा वेळ झोप घेण्याची (Short Nap) ऑफर दिली आहे. या झोप घेण्याच्या वेळेत कोणत्याही कर्मचाऱ्याचा पगार, पैसेही कट केले जाणार नाहीत. कर्मचाऱ्यांच्या हितासाठी हे जबरदस्त पाऊल उचलणाऱ्या कंपनीचं नाव वेकफिट सोल्यूशन (Wakefit Solution) आहे. बेंगळुरूमध्ये असलेल्या या भारतीय स्टार्टअप कंपनीने याबाबत घोषणा केली आहे. ऑफसमध्ये येणाऱ्या कर्मचारी दररोज ड्यूटीच्या वेळेत 30 मिनिटं अर्थात अर्धा तास झोपू शकतात. कंपनीने याबाबत टाइमटेबलही जारी केलं आहे. या निर्णयामुळे कर्मचारी फिट राहतील आणि अधिक उत्साहात काम करतील असं कंपनी व्यवस्थापनाचं म्हणणं आहे. कर्मचारी दररोज दोन ते अडीच या वेळेत अर्धा तासाची झोप घेऊ शकतात. कर्मचाऱ्यांना झोपण्यासाठी एका जागेचीही सोय करण्यात आली आहे. ही स्टार्टअप कंपनी स्लीप सोल्यूशन देण्याचं काम करते.

हे वाचा -  तुमच्या गॅस सिलेंडरवर इन्शुरन्स कव्हर उपलब्ध; एखाद्या दुर्घटनेनंतर मिळेल नुकसान भरपाई

कंपनीचे सहसंस्थापक चैतन्य रामालिंगेगौडा यांनी याबाबत सर्व कर्मचाऱ्यांना ईमेल पाठवून निर्णयाची माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलं, की नासा हावर्ड यूनिवर्सिटीमधील अभ्यासात दररोज दुपारी अर्धा तासाची झोप घेतल्यास व्यक्ती ताजातवाना होऊ शकतो आणि त्याचा परफॉर्मेन्स 33 टक्क्यांपर्यंत वाढू शकतो. कंपनीच्या या निर्णयाने कर्मचारी अतिशय आनंदी असून काम सुधारण्याच्या दिशेन ही चांगली बाब असल्याचं म्हटलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या