मुबंई, 15 मार्च : जर घरी बसून व्यवसाय करण्याचा विचार करत असाल, तर कोरफडीची लागवड करुन लाखो रुपये कमाईची संधी आहे. हा सध्याचा काळातला सर्वात फायदेशीर व्यवसाय मानला जात आहे. आतापर्यंत बऱ्याच लोकांनी कोरफडीची शेती करुन लाखो रुपयांची कमाई केली आहे. कोरफडची बाजारामध्ये वाढती मागणी लक्षात घेता याची लागवड करणं खूपच फायदेशी ठरू शकतं आणि चांगलं उत्पन्न देखील मिळू शकतं. कंपन्यांमध्ये कोरफडीला अधिक मागणी - हर्बल आणि कॉस्मेटिक्स प्रोडक्टमध्ये कोरफडीची मागणी वाढत चालली आहे. औषध, हर्बल, कॉस्मेटिक प्रोडक्टमध्ये मोठ्या प्रमाणात कोरफडीचा वापर केला जातो. हे प्रोडक्ट तयार करणाऱ्या कंपनी कोरफडची खरेदी करतात. काही कंपन्या कोरफडीची कॉन्ट्रक्ट पद्धतीने शेती देखील करतात. जर व्यवसायिक पद्धतीने तुम्ही कोरफडीची शेती केली तर वर्षाला 8 ते 10 लाख रुपये कमवू शकता. इंजिनिअरिंगपासून ते एमबीए करणारे करतात शेती - कोरफडीची वाढती मागणी लक्षात घेता उच्च शिक्षित तरुण आता नोकरी करण्याऐवजी शेती करण्याकडे जास्त आकर्षित होत आहेत. जास्त प्रमाणात लोकं कोरफडीचं उत्पादन घेण्यासाठी इच्छुक आहेत. ते आता प्रोसेसिंग युनिट सुरू करू इच्छित आहेत. नुकताच प्रोसेसिंग युनिट सुरू केलेल्या एका व्यवसायिकानं सांगितलं की, ‘आतापर्यंत माझ्या घरामध्ये गहु, बटाट्याचं उत्पादन घेतलं. मला वाटलं काहीतरी नवीन आणि फायदेशीर केलं पाहिजे. राजस्थानमधून रोपं मागवून मी कोरफडीची शेती सुरू केली. आता या शेतीतून लाखो रुपयांची कमाई करत आहे.’
युनिट सुरु करण्याचं दिलं जातं ट्रेनिंग - जर तुम्हाला कोरफडीचं प्रोसेसिंग युनिट सुरू करण्याची इच्छा असेल, तर सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसिनल अँड अॅरोमॅटिक प्लांट्स (CIMAP) काही महिन्यांसाठी ट्रेनिंग देत आहे. याचं रजिस्ट्रेशन ऑनलाइन पद्धतीनं केलं जातं आणि फी दिल्यानंतर ट्रेनिंग सुरू होतं. कोरफडीची शेती कधी आणि कशी करावी - कोरफडीच्या शेतीसाठी उबदार हवामान चांगलं आहे. कोरफडीची लागवड कोरड्या भागात म्हणजे कमी पाऊस आणि उष्ण वातावरण असलेल्या भागात यशस्वीरित्या केली जाते. ही वनस्पती अत्यंत थंड परिस्थितीसाठी खूपच संवेदनशील आहे. जमीन किंवा मातीबद्दल सांगायचं झालं तर, वालुकामय ते चिकणमाती अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मातीमध्ये याची लागवड करता येते.
वालुकामय माती यासाठी खूपच चांगली असते. याव्यतिरिक्त काळ्या मातीमध्ये याची लागवड केली जाऊ शकते. जमीनीची निवड करताना हे लक्षात घेतलं पाहिजे की, कोरफडीच्या लागवडीसाठी जमीन अशी असावी ज्यात भूजल पातळी थोडी उंचीवर आहे आणि शेतामध्ये योग्य ड्रेनेज सिस्टम असणं आवश्यक आहे. कोरफडीची लागवड जुलै- ऑगस्टमध्ये करणं योग्य असतं.
कोरफडीच्या लागवडीसाठी किती येतो खर्च - इंडियन काउंसिल फॉर अॅग्रीकल्चर रिसर्चने (ICAR) सांगितल्याप्रमाणे, एका हेक्टरमध्ये कोरफडीच्या लागवडीसाठी जवळपास 27,500 रुपयांचा खर्च येतो. मजूरी, शेतीची तयारी, खत हे सर्व मिळून पहिल्या वर्षात हा खर्च 50,000 पर्यंत जातो. एका हेक्टर क्षेत्रामध्ये कोरफडीच्या लागवडीने सुमारे 40 ते 50 टन जाड पानं मिळू शकतात. हे आयुर्वेदिक औषध तयार करणाऱ्या कंपन्या आणि कॉस्मेटिक प्रोडक्ट तयार करणाऱ्या कंपन्यांना विकलं जाऊ शकतं. कोरफडीच्या जाड पानांना देशातील वेगवेगळ्या मार्केटमध्ये मोठी मागणी असून प्रति टन जवळपास 15,000 ते 25,000 रुपये मिळू शकतात. यानुसार तुम्ही जवळपास 8 ते 10 लाख रुपयांची कमाई करु शकता.