JOIN US
मराठी बातम्या / मनी / एकच नंबर! Home Loan EMI सोबतच सुरु करा SIP, 20 वर्षांत घराची पूर्ण किंमत होईल रिकव्हर

एकच नंबर! Home Loan EMI सोबतच सुरु करा SIP, 20 वर्षांत घराची पूर्ण किंमत होईल रिकव्हर

Start SIP with Home Loan EMI: गृहकर्जासारख्या दीर्घ मुदतीच्या कर्जासाठी आर्थिक नियोजन करणं फायदेशीर ठरतं. योग्य नियोजन केल्यास तुम्ही तुमचे खूप पैसे वाचवू शकता.

जाहिरात

एकच नंबर! Home Loan EMI सोबतच सुरु करा SIP, 20 वर्षांत घराची पूर्ण किंमत होईल रिकव्हर

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 1 ऑगस्ट: घर खरेदी करणं प्रत्येकाचं स्वप्न असतं. सध्याच्या काळात जर तुम्ही नोकरीसाठी बाहेर असाल, तर घर खरेदी करणं ही तुमची सर्वात मोठी गरज असू शकते. नोकरी मोठ्या शहरात असेल तर तिथं घर घेण्यासाठी मोठी किंमत मोजावी लागते. बहुसंख्य मध्यमवर्गीयांसाठी घर खरेदी करण्यासाठी नाईलाजानं गृहकर्ज घ्यावं लागतं. ज्याच्या बदल्यात बँकेला भरपूर व्याज द्यावं लागतं. त्यामुळे दीर्घ मुदतीसाठी आर्थिक नियोजन करणं चांगले आहे, जेणेकरून घर खरेदीसाठी खर्च होणारी रक्कम वाचवता येईल. म्हणजेच तुमच्या घराची संपूर्ण किंमत वसूल झाली पाहिजे. या SIP साठी हा एक चांगला पर्याय आहे. EMI सुरू होताच, जर तुम्ही एका महिन्याच्या हप्त्यापैकी फक्त 20 टक्के SIP सुरू केली, तर 20 वर्षांनंतर तुम्हाला बँकेच्या कर्जाची किंमत आणि त्यावरील एकूण व्याज मिळेल. बीपीएन फिनकॅपचे संचालक ए के निगम म्हणतात की, इक्विटीमध्ये पैसे गुंतवणं हा दीर्घ मुदतीसाठी चांगला पर्याय आहे. बाजारात दीर्घकाळासाठी केलेली गुंतवणूकीमुळं अनेक जोखीम कव्हर केल्या जातात. इक्विटी डायव्हर्सिफाइड फंड निवडणं हा देखील एक चांगला पर्याय असू शकतो. रिटर्न चार्ट पाहता, असे अनेक फंड आहेत, ज्यांनी गेल्या 20 वर्षांत 12 ते 15 टक्के CAGR किंवा त्याहून अधिक परतावा दिला आहे. 20 वर्षांसाठी 30 लाख कर्जाचं नियोजन-

हेही वाचा-  ITR Verification: मुदत संपली तरीही इन्कम टॅक्स रिटर्न भरला नाही? कारवाई टाळण्यासाठी करा ‘हे’ काम येथे तुम्हाला दरमहा EMI मूल्याच्या 20 टक्के SIP करावे लागेल, जे सुमारे 5000 रुपये असेल.

येथे तुमचा घर खरेदी करण्याचा संपूर्ण खर्च सुमारे 60 लाख रुपये आहे. तर SIP चे मूल्य 66 लाख रुपये आहे. म्हणजेच तुम्हाला एकूण किंमतीपेक्षा थोडा जास्त निधी मिळेल. जरी तुम्ही SIP मध्ये गुंतवलेल्या 12 लाखांचे मूल्य काढून टाकलं तरी तुम्हाला सुमारे 54 लाख रुपये मिळतील. 20 वर्षांसाठी सर्वाधिक SIP परतावा असलेले फंड-

(टीप: वरील माहिती तज्ञांच्या मतांवर आणि फंडाच्या कामगिरीवर आधारित माहिती देत ​​आहोत. आम्ही या गुंतवणुकीची शिफारस केलेली नाही. मार्केटमध्ये गुंतवणूक करणं जोखमीचं असतं. त्यामुळं गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या