JOIN US
मराठी बातम्या / मनी / 6 लाखांची गुंतवणूक करून दरमहा कमवा 1 लाख रूपये, या व्यवसायात मिळेल भरपूर नफा

6 लाखांची गुंतवणूक करून दरमहा कमवा 1 लाख रूपये, या व्यवसायात मिळेल भरपूर नफा

भारतीय लोक खाण्यापिण्याचे शौकीन आहेत आणि बहुतेक घरांमध्ये रोजच्या जेवणात पापडाचा समावेश असतो. त्यामुळे याची मागणी कायम असते

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 30 जुलै : कोरोनाच्या (Corona) काळात अनेकांची नोकरी (Jobs) गेली. त्यामुळे नोकरी किती अनिश्चित आहे, याचा अनुभव या काळात लोकांना आला. नोकरी गेल्याने उत्पन्नाचे स्रोत बंद झाल्यामुळे त्यांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं. नंतर परिस्थिती सामान्य होत असताना अनेकांनी ही अनिश्चितता टाळण्यासाठी व्यवसाय करणं पसंत केलं. नोकरी गमावलेले लोक दुसरीकडे नोकरी शोधण्याऐवजी छोट्या व्यवसायांकडे (Small Business) वळले आणि चांगले पैसे कमवू लागले. असाच एक छोटासा व्यवसाय म्हणजे विविध प्रकारचे पापड तयार करून विकण्याचा व्यवसाय (Papad Business) आहे. तुम्ही कमी खर्चात हा व्यवसाय सहज सुरू करू शकता. भारतीय लोक खाण्यापिण्याचे शौकीन आहेत आणि बहुतेक घरांमध्ये रोजच्या जेवणात पापडाचा समावेश असतो. त्यामुळे याची मागणी कायम असते. या व्यवसायात कमी खर्चात तुम्ही प्रचंड नफा कमवू शकता. भारत सरकारच्या नॅशनल स्मॉल इंडस्ट्रीज कॉर्पोरेशनने (NSIC) यासाठी एक प्रोजक्ट तयार केला आहे. पापड व्यवसायासाठी सरकारकडून स्वस्त दरात कर्जही मिळतं. आज आम्ही तुम्हाला या व्यवसायाची सर्व माहिती देणार आहोत. पत्नीच्या नावे उघडा ‘हे’ अकाउंट, दर महिन्याला मिळतील 45 हजार रुपये, वाचा काय आहे योजना किती गुंतवणूक करावी लागणार? पापड व्यवसायात तुम्हाला सुरुवातीला 6 लाख रुपये गुंतवणूक करावी लागेल. त्यात तुम्ही 30,000 किलो पापडांचं उत्पादन करू शकाल. यासाठी तुम्हाला 250 चौरस मीटर जागेची आवश्यकता असेल. या खर्चामध्ये तुमचं भांडवल आणि खेळतं भांडवल दोन्ही समाविष्ट आहे. भांडवलातून मशीन्स आणि इतर उपकरणं खरेदी करता येतील. तर, वर्किंग कॅपिटल म्हणजे खेळत्या भांडवलामध्ये कामगारांचा 3 महिन्यांचा पगार, तेवढ्याच दिवसांचा कच्चा माल आणि युटिलिटी प्रॉडक्टचा खर्च यांचा समावेश असेल. तसंच, जर तुम्ही जागा भाड्याने घेत असाल, तर जागेचं भाडं, वीज, पाणी या बिलाचाही त्यात समावेश केला जाईल. बिझनेससाठी कोणत्या गोष्टी लागतील? तुम्हाला पापडांचा बिझनेस सुरू करायचा असेल तर तुम्हाला मोकळ्या जागेशिवाय 3 मजूर (अकुशल देखील असू शकतात), 2 कुशल कामगार आणि एक सुपरवायझर यांना सोबत घ्यावं लागेल. आम्ही सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे, तुम्ही यासाठी कर्ज (Loan) घेऊ शकता. केंद्राच्या मुद्रा योजनेअंतर्गत (Mudra Yojana) तुम्हाला 4 लाख रुपयांचं कर्ज मिळेल आणि तुम्हाला स्वतःजवळचे फक्त 2 लाख रुपये गुंतवावे लागतील. हे कर्ज तुम्हाला कोणत्याही बँकेकडून (Bank) मिळू शकतं, ते तुम्हाला 5 वर्षापर्यंत केव्हाही फेडता येईल. IPO मध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी ‘या’ गोष्टींची घ्या काळजी, नाहीतर होईल मोठं नुकसान उत्पन्न किती होईल तुम्ही पापड तयार करून घाऊक बाजारात विकू शकता किंवा ते किरकोळ दुकानदार, सुपरमार्केटमध्ये (Supermarket) खुल्या स्वरूपात सप्लाय करू शकता. तज्ज्ञांच्या मते, 6 लाख रुपयांची गुंतवणूक करून तुम्ही दरमहा 1 लाख रुपये कमवू शकता. दर महिन्याला येणारा खर्च काढून टाकल्यास तुम्हाला 35-40 हजारांचा निव्वळ नफा मिळू शकतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या