JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनी / Good News! मोदी सरकारकडून आजपासून खरेदी करा स्वस्त सोनं, RBI ने जारी केली किंमत

Good News! मोदी सरकारकडून आजपासून खरेदी करा स्वस्त सोनं, RBI ने जारी केली किंमत

तुम्हाला जर बाजारभावापेक्षा स्वस्त सोनंखरेदी (Gold Price) करायची असेल आजपासून मोदी सरकार ही संधी तुम्हाला देत आहे. 12 जुलैपासून तुम्हाला स्वस्तात सोन्याची खरेदी (Gold investment) करता येणार आहे.

0108

तुम्हाला जर सध्याच्या दरापेक्षा स्वस्त सोनंखरेदी (Gold Price) करायची असेल तर आजपासून तुम्हाला ही संधी मिळणार आहे. सोमवारपासून तुम्हाला स्वस्तात सोन्याची खरेदी (Gold investment) करता येणार आहे.

जाहिरात
0208

आजपासून सॉव्हरेन गोल्ड बाँड स्कीम 2021-22 ची चौथी सीरिज (Sovereign Gold Bond Scheme 2021-22 – Series IV) सुरू झाली आहे. या अंतर्गत स्वस्त सोन्याची विक्री होईल. ही विक्री 16 जुलैपर्यंत होणार आहे. रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या या सीरिजमधील सोन्याची किंमत प्रति ग्रॅम 4,807 रुपये निश्चित करण्यात आली आहे. सरकारच्या वतीने आरबीआय (Reserve Bank of India) सॉव्हरेन गोल्ड बाँड (Sovereign Gold Bond) जारी करतं. तुम्ही जर गुंतवणूक करणार असाल तर जाणून घ्या सविस्तर माहिती.

जाहिरात
0308

ऑनलाइन खरेदीवर मिळेल विशेष सूट- हे बाँड खरेदी करण्यासाठी ऑनलाइन प्रणालीचा (Buy Gold Online) वापर केल्यास तुम्हाला आणखी सूट देखील मिळणार आहे. सोनेखरेदीसाठी ऑनलाइन अर्ज आणि पेमेंट केल्यास गुंतवणूकदारांना प्रति ग्रॅम 50 रुपयांची सूट देखील मिळेल. अर्थात ऑनलाइन खरेदी करणाऱ्यांना सॉव्हरेन गोल्ड बाँड 4,757 रुपये प्रति ग्रॅमने खरेदी करता येतील.

जाहिरात
0408

कुठे खरेदी करता येतील सॉव्हरेन गोल्ड बाँड?- तुम्ही गोल्ड बाँडची खरेदी ऑनलाइन करू शकता. याशिवाय याची विक्री बँक, सर्व कमर्शिअल बँका (आरआरबी, लघू वित्त बँक व्यतिरिक्त), स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, निवडण्यात आलेले पोस्ट आणि एनएसई तसच बीएसईच्या माध्यमातून होते. यातील कोणत्याही ठिकाणी जाऊन तुम्ही बाँड योजनेमध्ये सामील होऊ शकता. स्मॉल फायनान्स बँका आणि पेमेंट बँकांमध्ये यांची विक्री केली जात नाही.

जाहिरात
0508

किती करता येईल गुंतवणूक?- सरकारकडून आरबीआयच्या (Reserve Bank of India RBI) माध्यमातून हे सॉव्हरेन गोल्ड बाँड (Gold Bond) जारी केले जातात. या स्कीममध्ये एका आर्थिक वर्षात एखादी व्यक्ती जास्तीत जास्त 4 किलो तर कमीत कमी 1 ग्रॅम गोल्ड बाँडची खरेदी करू शकते. शिवाय ट्रस्ट किंवा यासारख्या संस्था जास्तीत जास्त 20 किलो बाँडची खरेदी करू शकतात. याकरता जारी होणारे अर्ज 1 ग्रम किंवा त्याच्या पटीमध्ये असतात.

जाहिरात
0608

आरबीआयने अशी माहिती दिली आहे की, भारत बुलियन अँड असोसिएशन लिमिटेडकडून गोल्ड बाँड जारी करण्याच्या आधीच्या आठवड्यातील शेवटच्या 3 व्यवहाराच्या दिवसात 999 शुद्धतेच्या सोन्याच्या किंमतीच्या आधारे या बाँडच्या किंमती ठरतात.

जाहिरात
0708

सॉव्हरेन गोल्ड बाँड म्हणजे काय?- सॉव्हरेन गोल्ड बाँड एक सरकारी बाँड असतो. ज्याला डिमॅट स्वरुपात परिवर्तित करता येतं. याचं मुल्य रुपये किंवा डॉलरमध्ये असत नाही तर सोन्याच्या वजनात असतं. जर बाँड पाच ग्रॅम सोन्याचा आहे तर पाच ग्रॅम सोन्याची जितकी किंमत असेल तेवढी किंमत या बाँडची असेल. सरकारकडून आरबीआयच्या माध्यमातून हे सॉव्हरेन गोल्ड बाँड जारी केले जातात. सरकारने सॉव्हरेन गोल्ड बाँडची सुरुवात नोव्हेंबर 2015 मध्ये केली होती.

जाहिरात
0808

का आहे सॉव्हरेन गोल्ड बाँड फायदेशीर?- 1) मॅच्युरिटीवर सॉव्हरेन गोल्ड बाँड टॅक्स फ्री होतात 2) भारत सरकार द्वारे जारी करण्यात येत असल्याने डिफॉल्टची भीती नाही. 3) फिजिकल गोल्ड ऐवजी गोल्ड बाँड सांभाळणं अधिक सोपं आणि सुरक्षित. 4) यामध्ये शुद्धतेची समस्या येत नाही आणि किंमती सर्वात शुद्ध सोन्याच्या आधारे निश्चित केल्या जातात. 5) एक्झिटचा पर्यायही सोपा आहे. 6) गोल्ड बाँडच्या आधारे कर्जाची सुविधा मिळते. 7) या बाँड्सचा मॅच्यूरिटी पीरिएड 8 वर्षांचा असतो. मात्र तरी देखील 5 वर्षांनी प्रीमॅच्यूअर विड्रॉल करता येते.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या