Sovereign Gold Bond मध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुम्ही वाट बघत असाल तर तुम्हाला उद्यापासून ही संधी मिळणार आहे. मोदी सरकार स्वस्त किंमतीत हे सोने विकत आहे. जाणून घ्या काय आहे किंमत आणि गोल्ड बाँडचे फायदे..
Sovereign Gold Bond मध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुम्ही वाट बघत असाल तर तुम्हाला उद्यापासून ही संधी मिळणार आहे. मोदी सरकार स्वस्त किंमतीत हे सोने विकत आहे. जाणून घ्या काय आहे किंमत आणि गोल्ड बाँडचे फायदे..
सध्या सणासुदीचा काळ (Buying Gold During Festive Season) म्हटलं की अनेकांसाठी सोन्याच्या दागिन्यांची खरेदी हे समीकरण ठरलेलं असतं. दरम्यान आता काळ बदलत आहे आणि काळानुरुप सोनं खरेदी करण्याची पद्धतही बदलत आहे. तुम्ही आता फिजिकल गोल्डपेक्षा डिजिटल गोल्डमध्ये सहज गुंतवणूक करू शकता.
.25 ऑक्टोबर 2021 पासून सॉव्हरेन गोल्ड बाँड स्कीम 2021-22 ची सातवी सीरिज (Sovereign Gold Bond Scheme 2021-22 – Series-VII) सुरू होत आहे. ही योजना फक्त पाच दिवसांसाठी (25 ते 29 ऑक्टोबर) खुली असणार आहे. या काळात गुंतवणूकदारांना बाजारपेठेपेक्षा कमी दराने सोने खरेदी करण्याची संधी मिळेल. सॉव्हरेन गोल्ड बाँड स्कीम सरकारच्या वतीने RBI द्वारे जारी केला जातो.
कधी जारी होणार गोल्ड बाँड?- अर्थ मंत्रालयाच्या मते, 2021-22 गोल्ड बाँड्सच्या सीरिजअंतर्गत, ऑक्टोबर 2021 आणि मार्च 2022 दरम्यान चार टप्प्यांत बाँड जारी केले जातील. या सीरिडअंतर्गत मे 2021 ते सप्टेंबर 2021 पर्यंत सहा टप्प्यांत बॉण्ड जारी करण्यात आले आहेत. मंत्रालयाने अशी माहिती दिली आहे की 2021-22 सीरिज- VII साठी सबस्क्रिप्शन कालावधी 25 ऑक्टोबर ते 29 ऑक्टोबर पर्यंत असेल आणि 2 नोव्हेंबर रोजी बाँड जारी केले जातील.
काय आहे किंमत?- सॉव्हरेन गोल्ड बाँड स्कीम 2021-22 च्या सातव्या सीरिजची इश्यू प्राइस 4,765 रुपये प्रति ग्रॅम निश्चित करण्यात आली आहे. शनिवारी अर्थ मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे.
ऑनलाइन खरेदीवर मिळेल सूट- हे बाँड खरेदी करण्यासाठी ऑनलाइन प्रणालीचा (Buy Gold Online) वापर केल्यास तुम्हाला आणखी सूट देखील मिळणार आहे. सोनेखरेदीसाठी ऑनलाइन अर्ज आणि पेमेंट केल्यास गुंतवणूकदारांना प्रति ग्रॅम 50 रुपयांची सूट देखील मिळेल. अर्थात हे गोल्ड बाँड ऑनलाइन खरेदी केल्यास 4,715 रुपयांना मिळतील.
कुठे करता येईल खरेदी?- कोणतीही व्यक्ती, हिंदू अविभाजित परिवार (HUF), ट्रस्ट, विद्यापीठ आणि धर्मसंस्था बाँडच्या सदस्यत्वासाठी अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. तुम्ही सर्व कमर्शिअल बँका (आरआरबी, लघू वित्त बँक व्यतिरिक्त), स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, निवडण्यात आलेले पोस्ट आणि एनएसई तसच बीएसईच्या माध्यमातून याची खरेदी करू शकता.
जास्तीत जास्त खरेदीची काय आहे मर्यादा?- सरकारकडून आरबीआयच्या (Reserve Bank of India RBI) माध्यमातून हे सॉव्हरेन गोल्ड बाँड जारी केले जातात. या स्कीममध्ये एका आर्थिक वर्षात एखादी व्यक्ती जास्तीत जास्त 4 किलो तर कमीत कमी 1 ग्रॅम गोल्ड बाँडची खरेदी करू शकते. शिवाय ट्रस्ट किंवा यासारख्या संस्था जास्तीत जास्त 20 किलो बाँडची खरेदी करू शकतात. याकरता जारी होणारे अर्ज 1 ग्रम किंवा त्याच्या पटीमध्ये असतात.