फिक्स्ड डिपॉझिट
मुंबई, 7 मे: कोणत्याही बँकेत एफडी करण्यापूर्वी, तुम्ही बँकांकडून मुदत ठेवींवरील व्याजदर तपासणे महत्त्वाचं असतं. कारण सध्या अनेक बँका एफडीवर भाजी व्याज देत आहेत. सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेने 1 वर्ष ते 5 वर्षांच्या कालावधीत ₹ 2 कोटी पेक्षा कमी मुदत ठेवींवरील व्याजदर 49 ते 160 बेसिस पॉइंट्सने वाढवले आहेत. नवीन व्याजदर 5 मे 2023 पासून लागू करण्यात आले आहेत. सामान्य नागरिकांना FD वर 4% ते 9.10% पर्यंत व्याज मिळतेय. तर, ज्येष्ठ नागरिक 4.50% ते 9.60% व्याज कमावू शकतील. याव्यतिरिक्त, ही स्मॉल फायनेंस बँक बचत खात्यांवर ₹5 लाख ते ₹2 कोटी पर्यंतच्या शिल्लक राशीवर 7% भक्कम व्याजदर देत आहे.
1 वर्षाच्या कालावधीवर, FD दर 6.85% आहे.तर 1 वर्ष ते 2 वर्षांच्या कालावधीसाठी 8.50% व्याज आणि 999 दिवसांच्या कार्यकाळावर 9% व्याज मिळत आहे. 5 वर्षांच्या कालावधीसाठी ऑफर केलेला सर्वोच्च दर 9.10% आहे. 2 वर्षे ते 998 दिवसांच्या कालावधीवर 7.51% व्याजदर दिला जातो. 1 वर्षापेक्षा कमी कालावधीसह, FD दर 4% ते 6% पर्यंत असतात. ‘या’ पिकातून करा लाखोंची कमाई, लागवडीचा खर्च फक्त 20 हजार; दुष्काळग्रस्त भागातही येते पीक
-ज्येष्ठ नागरिकांना 1 वर्षाच्या कार्यकाळावर 7.35% दर मिळेल. -3 वर्षांपेक्षा जास्त परंतु 5 वर्षांपेक्षा कमी कार्यकाळावर 7.25% -32 महिने 27 दिवस ते 3 वर्षे आणि 5 वर्षे ते 10 वर्षे कालावधीसाठी 7.75% व्याजदर दिला जातो. -5 वर्षांच्या कालावधीसाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी सर्वाधिक दर 9.60% आहे. -1 वर्ष ते 2 वर्षांच्या कालावधीसाठी 9% आणि 999 दिवसांच्या कालावधीसाठी 9.50% दर देत आहे. -2 वर्षे ते 998 दिवसांच्या कालावधीसाठी 8.01% दर देत आहे. FD वर या उच्च व्याजदरांचा लाभ घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिक किंवा सेवानिवृत्त कर्मचारी 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे असणे आवश्यक आहे. सूर्योदय बँकेतील व्याज दर 6 महिन्यांपेक्षा जास्त कालावधीच्या ठेवींसाठी तिमाही आधारावर मोजला जातो. 6 महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या ठेवींसाठी, मॅच्योरिटीवर साधारण व्याज दिले जाते.